• Mon. Apr 20th, 2026

*केज नगरपंचायत चा कारभार रामभरोसे,सत्ताधारी नगरसेवकाचेच अमरण उपोषणाचा इशारा.*

Bybaba maske

Nov 3, 2022

केज नगरपंचायत चा कारभार रामभरोसे,सत्ताधारी नगरसेवकाचेच अमरण उपोषणाचा इशारा.

रोखठोक वार्ताहर 

केज नगरपंचायत होऊन नऊ दहा महिने झाले असतानाच सत्ताधारी पक्षात रूसाफुगी चालु झाली आहे.नगरपंचायत चे सत्ताधारी गट्टाचे वार्ड क्रमांक अकरा चे नगरसेविका तरमिमबेगम गजमफर(पप्पु आण्णा) इनामदार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन अमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.निवेदनात सविस्तर निवेदन केले आहे की मी आकरा वार्ड क्रमांक ची नगरसेविका असुन सत्तास्थापने पासुन माझ्या प्रभागातील विविध समस्या मी नगरपंचायत कडे तोंडी,लेखी कळवते पण आजतागायत पणे माझ्या वार्डात कुठलेही काम झाले नाही.जानुन बूजुन लक्ष देत नाही, मी नगरसेविका असताना जर हे हाल आहेत तर सर्वसामान्य लोंकाचे नगरपंचायत मध्ये काय हाल असतील असा प्रश्न उपस्थित केला आहे.तसेच घनकचरा व्यवस्थापनात मोठ्या प्रमाणात अनियमिता आहे.मागील काळातील टेंडर संपलेले असताना नवीन टेंडर काढले नाही किंवा वर्तमानपत्रात जाहीरात दिली नाही.नगरपंचायत असंविधानीक व आपल्या मनमर्जी प्रमाणे काम करत असल्याचा दुसरा आरोप केला आहे.तसेच पाणी पुरवठा व जनरल खाते या मध्ये कसा खर्च झाला हे निवेदना द्वारे विचारले असता आता पर्यंत कसलीच माहिती उपलब्ध करून दिली नाही.14/ऑक्टोबर/2022 रोजी वरीलप्रमाणे माहिती उपलब्ध करून न दिल्या मुळे केज नगरपंचायत लेखा विभाग पाणीपुरवठा,आरोग्य,बांधकाम, स्वच्छता या विभागाची चौकशी करावी अन्याथा 28/नोव्हेंबर/2022 रोजी जिल्हाधिकारी साहेब बीड यांच्या कार्यालया समोर अमरण उपोषण करण्यात येईल असा इशाराच देण्यात आला आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!