नापिकीला कंटाळून केज तालुक्यात शेतकऱ्याच्या मुलाची आत्महत्या
गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यात नांदूरघाट येथे ३५ वर्षीय युवकांने नापिकीला कंटाळून आणि वडिलांच्याकडे असलेल्या कर्जाच्या विवंचनेतून नदी पत्रातील बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील संजय त्रिमुखे वय ३५ वर्ष या विवाहित तरुणाने सततच्या नापिकी आणि त्याच्या शेतकरी असलेल्या राजाराम त्रिमुखे वडिलांच्या नावे असलेल्या कर्जाला कंटाळून गुरुवार दि. ३ नोव्हेंबर रोजी नदी पात्रातील बाभळीच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
माहिती मिळताच पोलीस नाईक अशोक मेसे आणि रशीद शेख हे घटनास्थळी पोहोचले.
संजय त्रिमुखे यांच्या पाश्चात आई वडील, पत्नी आणि एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे.