रोखठोक चा अंदाज खरा ठरला,टीएचओ कार्यालय चे बांधकाम उपजिल्हा रुग्णालय परिसरात चालू.
केज तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय भुमाफियाच्या घशात घालण्याचा डाव अखेर यशस्वी झाला.
केज तालुका आरोग्य अधिकारी यांचे कार्यालय केज शहरातील जुना दवाखान्यात मधोमध मोक्याच्या ठिकाणी आहे,त्या ठिकाणी जुनी पण प्रशस्त इमारत आहे तसेच त्या अंतर्गत तालुक्यातील प्राथमिक उपचार केंद्र व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येतात त्यांच्या साठी अगदीच योग्य ठिकाण व कार्यालयीन कामकाजासाठीच योग्य असे मध्यवर्ती ठिकाण असताना गेल्या महिन्यात रोखठोक न्युज ने बातमी करून या साठी आवाज उठवला होता कि टीएचओ कार्यालय उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात येणार आहे पण त्या कडे कोणीच राजकीय नेत्यानी किंवा सामाजिक संघटनेनी अवाज उठवला नसल्याने अखेर टीएचओ कार्यालयाचे बांधकाम चे खोदकाम झाले आहे.आता तालुका आरोग्य कार्यालय खंडर होऊन त्या वर भुमाफिया अतिक्रमण करून ताब्यात घेतील व अश्या प्रकारे मोक्याची जागा गिळंकृत करतील.केज वाशीयांची खुप जुनी मागणी आहे की त्या ठिकाणी बाह्यरुग्ण विभाग चालु करावा कारण उपजिल्हा रुग्णालय शहरा पासुन तिन ते चार किलोमीटर वर असल्या कारणाने मध्यवर्ती ठिकाणी बाह्यरुग्ण विभाग चालु करावा.पण असे न होता तालुका आरोग्य कार्यालय च हववले आहे त्या मुळे जनतेत आश्चर्य व्यक्त होत असून.ऐवढी मोक्याची जागा घशात घालण्याचा कोणाचा डाव आहे या वर जनतेत चर्चा होत असल्याचे दिसत आहे.