• Sat. Apr 25th, 2026

*नगरपंचायत ने शौचालय ठेवले वस्तु संग्रहालयात:पहाण्या साठी लवकर टिकीट लावणार का?महिला नगराध्यक्ष असताना महिलांची हेळसांड!!.*

Bybaba maske

Nov 7, 2022

नगरपंचायत ने शौचालय ठेवले वस्तु संग्रहालयात:पहाण्या साठी लवकर टिकीट लावणार का?महिला नगराध्यक्ष असताना महिलांची हेळसांड!!

केजला स्विझर्लंड चे स्वप्न दाखवणाऱ्या नेत्यांनो, केजला साधी मुतारी तरी बांधा.

रोखठोक वार्ताहर 

केज नगरपंचायत च्या हद्दी मध्ये मुतारी,शौचालय कोठेच नाही.केज शहरात 50 हजाराच्या आसपास लोकसंख्या असलेल गाव आहे. बीड जिल्ह्य़ातील मोठी बाजारपेठ असुन 140 गावाचा सहभाग केज तालुक्यात आहे.आठवड्यातून दोन वेळेस मंगळवार व शुक्रवार असा बाजार भरतो,त्यामुळे खेड्यापाड्यात येणारी महिला पुरूषांची संख्या खुप मोठी आहे हमेशा वर्दळीचे असलेले हे शहर आहे.पण बस स्टॅंड शिवाय सार्वजनिक मुतारी किंवा शौचालय शहरात कोठेही अढळुन येत नाही दोन आठवडी बाजार तळ असुन तिथे ही कुठल्याच प्रकारची व्यवस्था नसल्याने खुप गैर सोईचा सामना जनतेस करावा लागतो विषेश म्हणजे महिला वर्गाला अपमानास्पद उघड्यावर मुत्रविसर्जन किंवा मलविसर्जन करावे लागते हे एका महिला नगराध्यक्ष असलेल्या नगरपंचायत ला भूषणावह आहे का?भाजी पाला विक्री करणाऱ्या महिला विक्रत्यास आठ,नऊ घंटे लघवी दाबून बसावी लागते त्या मुळे त्यांना किडनीचे विकार होऊ शकतात असे डाॅक्टरांचे म्हणणे आहे.केज शहरात नगरपंचायत चे फिरते शौचालय असताना त्यास पाण्याच्या टाकी असलेल्या मोकळ्या जागेत ठेवले आहे.जनतेतून असा प्रश्न आहे की हे फिरते शौचालय वस्तुसंग्रहालय ठेवून याला बघण्यासाठी टिकीट आकारणार आहात का? कमीत कमी बाजाराच्या दिवशी बाजार तळावर फिरती शौचालय ठेवा. केज नगरपंचायत च्या समस्त स्त्रि वर्गाच प्रतिनीधी करणारे नगराध्यक्षा साहेब स्त्रियांच्याच समस्या कश्या विसरू शकतात असा प्रश्न सामान्य महिलावर्ग करत आहे.पुरुष कोठे ही आडोसा धरून मोकळे होतात पण हे सार्वजनिक आरोग्या साठी योग्य आहे का? याच उत्तर नगरपंचायत ने द्यावे.असा जनता सवाल उपस्थित करत आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!