• Sat. Apr 25th, 2026

*लेकरांचं भांडण मोठ्यात गेलं अन् भावानेच भावाचं डोकं फोडलं !*

Bybaba maske

Nov 7, 2022

लेकरांचं भांडण मोठ्यात गेलं अन् भावानेच भावाचं डोकं फोडलं!

पोराला का मारलं म्हणून विचारायला अन् भावाने भावाचा मार खाल्ला !

गौतम बचुटे/केज :- माझ्या लेकराला का चापट मारलीस? म्हणून सख्ख्या भावानेच भावाला डोक्यात दगड मारून जखमी केले.

केज तालुक्यातील आरणगाव येथील छत्रभुज सुदाम जगताप आणि नागनाथ सुदाम जगतात हे सख्खे भाऊ आहेत. किरकोळ कारणा वरून नागनाथ जगताप याने छत्रभुज जगताप याच्या मुलास चापट मारली; म्हणून छत्रभुज याने या बाबत नागनाथ विचापूस केली. त्याचा राग आल्याने नागनाथ जगताप याने दारात पडलेला दगड हातात घेवुन छत्रभुज याच्या डोक्यात घातला आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.

या प्रकरणी छत्रभुज जगताप याच्या फिर्यादी वरून नागनाथ जगताप याच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुं. र. नं. ५१०/२०२२ भा. दं. वि. ३२४, ३२३, ५०४ आणि ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राजू गुंजाळ हे पुढील तपास करीत आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!