• Sun. Apr 19th, 2026

पंकजा मुंडे आज केज तालुक्यात ; रखडलेल्या कामांची कोंडी फुटणार ?

Bybaba maske

Nov 10, 2022

पंकजा मुंडे आज केज तालुक्यात ; रखडलेल्या कामांची कोंडी फुटणार ?

भाजपतील अंतर्गत कलह मुंडेंसमोर येण्याची शक्यता…

रोखठोक/प्रतिनिधी

भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा माजी मंत्री पंकजा मुंडे ह्या आज (दि.१०) केज तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत.त्यांनी लक्ष घातल्यास भाजपतील अंतर्गत कलहामुळे रखडलेल्या रोहयो आणि इतर रस्त्यांच्या कोट्यवधींच्या विकासकामांची कोंडी फुटू शकते.पंकजा मुंडे ह्या दहिफळ वडमाऊली येथे भाजप महिला आघाडीच्या माजी जिल्हाध्यक्षा डॉ.शालिनी कराड मातोश्रींचे निधन झाल्यामुळे सांत्वनपर भेटीसाठी येत आहेत.त्यानंतर त्या केजमध्ये पदाधिकारी, कार्यकर्त्यांना भेटतील.भाजपतील अंतर्गत कलहामुळे रोजगार हमी विभागाअंतर्गत तालुक्यातील १७ गावांतील ४ कोटी ३० लाख रूपयांची २७ कामे रखडली आहेत.

तसेच,नांदुरघाट गटातील खुद्द पंकजा मुंडे यांनीच सन २०१८-२०१९ मध्ये भुमिपूजन केलेली तब्बल ४८ कोटी रूपयांची कामे रखडल्याचा दावा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य यांनी नुकताच केला आहे.ही कामे रखडल्यामुळे रस्त्यांअभावी नागरिकांचे हाल होत आहेत.लोकप्रतिनिधींच्या अंतर्गत वादाचा फटका जनतेला बसत आहे.त्यामुळे पंकजा मुंडे यांनी लक्ष घातल्यास कोट्यवधींच्या विकासकामांची कोंडी फुटू शकते.त्यांच्या दौऱ्याकडे पदाधिकारी,कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.दरम्यान,या दौऱ्यातच पक्षांतर्गत कलह देखील मुंडेंसमोर येण्याची शक्यता आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!