• Sat. Apr 25th, 2026

*केज तालुक्यात दारू कुठेही भेटते.परवानगीची गरज नाही*.  

Bybaba maske

Nov 11, 2022

केज तालुक्यात दारू कुठेही भेटते.परवानगीची गरज नाही.

उत्पादन शुल्क खात कसले असते,काय काम करते? केज शहरातील लोकांचा प्रप्रश्न.

रोखठोक न्युज 

केज तालुक्यात कुठेही म्हणजे रस्त्यावर, टपरीवर,हातगाडा,धाबा,साधे हाॅटेल प्रत्येक गावात, चौकात कोठेही दारू भेटते, हे सगळे उत्पादन शुल्क च्या भोंगळ कारभाराचा एक माॅडेल केज तालुक्यात तयार झाले आहे.या खात्याला कोण अधिकारी आहे कुणालाच माहीत नाही.हे महिन्याला येतात परमिट रूम बार,बियरशाॅपी ला भेट देतात चहा पाणी घेतात निघून जातात.यांना शासनाने का नियुक्त केले ते यांना तरी माहीत आहे का नाही माहित नाही.सगळ्या महाग दारू जर कोठे भेटत असेल तर केज मध्ये कारण बार मालक,बियरशाॅपी मालकाचा मनमानी, रेट कार्ड आहे.शासन अदेशा नुसार दारू बाॅटल चे भाव दर्शनी भागात लावावे पण केज शहरात, तालुक्यात कोठेच भाव फलक दिसुन येत नाही,त्यामुळेच मनमानी भाव आकरला जातो.केज शहर तालुक्यातील बार चालक आता होलसेल दारू विक्री करतात.संपुर्ण धाब्यावर,टपरीवर,हाॅटेल वर हे माल पोहोचवतात.रोखठोक न्युज च्या माहिती नुसार आठवड्यात एक वेळेस एक पिकअप सगळ्या कडे माल पोहचती करतो,जसे दुध वाटतो तसा….पोलीस दारू पकडतात, आरोपी पकडतात पण बॅच नंबर कुठला आहे,ऐवढी दारू एकदाच कशी आली याची चौकशी करत नाहीत.ही चौकशी झाली तर दारू माफीये क्षनात पकडली जातील,अता उत्पादन शुल्क च्या एस पी बीड यांनीच लक्ष घालावे व नविन पिढी वाचवावी असी सार्थ हाक जनता करत आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!