• Sat. Apr 25th, 2026

*सारणी (सांगवी) येथे शेतकऱ्याची आत्महत्या*

Bybaba maske

Nov 11, 2022

सारणी (सांगवी) येथे शेतकऱ्याची आत्महत्या

गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यातील सारणी (सांगवी) येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

या बाबतची माहिती अशी की, दि. ११ नोव्हेंबर सारणी (सांगवी) ता. केज येथील आश्रूबा भिमराव भांगे वय ((४२ वर्ष) या शेतकऱ्याने मागील वर्षी शेती पिकली नाही आणि यावर्षी अतिवृष्टीने शेतातील पिकाचे प्रचंड नुकसान झाले. तसेच बँकेचे कर्ज याच्या विवंचनेतून शुक्रवार दि. ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ७:०० पूर्वी त्याच्या शेतातील गट नंबर ६९ मधील घराच्या पाठी मागील बाजूस असलेल्या सुबाभळीच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

या प्रकरणी नांदूरघाट दुरुस्थ पोलीस चौकीचे पोलीस नाईक अशोक मेसे हे पुढील तपास करीत आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!