आरोग्य विभागाच्या वतीने राज्यातील जिल्हा शल्य चिकित्सक आणि उपसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली.
आर बी पवार डीडी तर चिंचोले,हुबेकर ,मुंडे झाले सीएस !
रोखठोक न्युज
आरोग्य विभागाच्या वतीने राज्यातील जिल्हा शल्य चिकित्सक आणि उपसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली.यामध्ये बीडला पूर्वी जिल्हा आरोग्य अधिकारी असणारे डॉ आर बी पवार उपसंचालक तर डॉ महादेव चिंचोले आणि अशोक हुबेकर आणि महानंदा मुंडे हे तिघे जिल्हा शल्य चिकित्सक झाले आहेत.
राज्य शासनाने आरोग्य विभागातील जवळपास 17 उपसंचालक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी वर्गातील अधिकाऱ्यांना उपसंचालक आणि सहसंचालक पदावर नियुक्ती देण्यात आली आहे.
यामध्ये सध्या सातारा येथे जिल्हा आरोग्य अधिकारी असणारे डॉ राधाकिसन पवार यांची पुणे येथे उपसंचालक म्हणून नियुक्ती झाली आहे. तसेच गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ महादेव चिंचोले यांची धुळे येथे आणि बीडचे डॉ अशोक हुबेकर यांची कोल्हापूर जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून पदोन्नती झाली आहे.तर नांदूरघाट येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ महानंदा मुंडे यांची औरंगाबाद येथे उपसंचालक म्हणून नियुक्ती झाली आहे.