केज नगरपंचायत मध्ये लेखापाल म्हणून सद्यस्थितीत सय्यद अन्वर यांची नियुक्ती केलेली असून सय्यद अन्वर यांची पाठिमागील कारकीर्द अतिशय भ्रष्ट आहे त्यांच्याकडे मागील जिल्हा परभणी, तालुका सोनपेठ येथील नगरपालिका मध्ये केलेल्या भ्रष्ट कारभारामुळे त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा ठपका ठेवून त्यांना शिक्षा म्हणुन त्यांचे इन्क्रिमेंट ( शासकीय लाभ ) बंद करण्यात आलेले आहे. तसेच केज नगरपंचायत मध्ये त्यांची बदली झाली असता त्यांच्याकडे कर व प्रशासकीय सेवा (क) श्रेणी असलेल्या पदावर नियुक्ती करण्यात आलेली असुन व त्यांच्यापेक्षा अनुभवाने पदाणे उच्च अधिकारी असून सुद्धा सय्यद अन्वर यांच्याकडे अनुभव नसताना ‘वा भ्रष्टाचाराचा ठपका असताना लेखापाल या पदाचा पदभार दिला आहे. तसेच केज नगरपंचायत मध्ये दिनांक ०१/१०/२०१९ पासुन आजपर्यंत लेखापाल पद रिक्त आहे. म्हणुन में साहेबांनी माझ्या तक्रार निवेदनाची दखल घेऊन तात्काळ भ्रष्ट असणाऱ्या लेखापालास पदमुक्त करुण अनुभवी अधिकाऱ्यांची नेमणूक करावी अन्यथा लोकशाही मार्गाने आपल्या कार्यालया समोर अंदोलन करण्यात येईल . असे निवेदन नगरसेविका तरमिमबेगम गजमफर इनामदार यांनी जिल्हा अधिकारी यांना देण्यात आलेले आहे .