डिप्टी सीईओ मोकाशे साहेब व काकाजी च्या मध्यस्थीने भाटुंबा गावचे सरपंचाचे व ग्रामस्थांचे उपोषण मागे.
रोखठोक वार्ताहर
केज तालुक्यातील भांटुबा गावचे सरपंच व ग्रामस्थ गेल्या सहा दिवसा पासुन केज तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करत होते.
अधिकान्यांनी जाणून बुजून ग्रामपंचायतची चुकीची वार्ड रचना केल्याचे उघड झाले आहे. मनरेगाच्या कामावरील मजुरांच्या कामाच वेतन अदा झालेले नाहीत [संगणक] चोरीला गेले आहेत. राष्ट्रीय पेयजल योजनेत केलेल्या भ्रष्टाचार.अंगणवाडी बांधकाम चे खोटे दस्तावेज दाखवून पैसे उचलले आहेत आरओ फिल्टर कागदावर दाखवून पैसे उचलले आहेत. आरवो फिल्टर न बसवता व रूम बांधकाम न करता पैसे उचले आहेत. इंदिरा आवास योजनेत मंजूर असलेल्या काम न करता जुने काम दाखवून पैसे उचलले आहेत. या अशा मागणी घेऊन उपोषण करत होते पण आज सहाव्या दिवशी डिप्टी सीईओ मोकाशे साहेब व नंदुशेठ मुंदडा यांच्या मध्यस्थीनंतर, जे संगणक गहाळ झाले आहेत त्याची ग्रामसेवक यांनी पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करावा व आरवो फिल्टर, अंगणवाडी बांधकाम, घरकुल या बाबतीत दोन महिन्याचा वेळ घेतला आहे व दोन महिन्यात यावर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिल्या नंतर रात्री 9:30 ला उपोषण मागे घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली.