• Sun. Apr 19th, 2026

ट्रॅक्टर व आयशर टेम्पोच्या अपघातात केज तालुक्यातील युवकाचा दुर्दैवी मृत्यू

Bybaba maske

Nov 16, 2022

ट्रॅक्टर व आयशर टेम्पोच्या अपघातात केज तालुक्यातील युवकाचा दुर्दैवी मृत्यू

रोखठोक वार्ताहर 

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील कोल्हेवाडी येथील ऊसतोड कामगारांचा आज सकाळी 6.00 वाजता ट्रॅक्टर व आयशर टेम्पोच्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.

 याविषयी सविस्तर वृत्त असे की केज तालुक्यातील कोल्हेवाडी येथील रहिवासी सुनील ज्ञानोबा मिसाळ हे आपल्या परिवारासह धाराशिव शुगर इंडस्ट्रीज येथे ऊस तोडण्याकरिता गेले होते. बुधवारी सकाळी सोलापूर-धुळे महामार्गावर येडशी जवळ ट्रॅक्टर व आयशर टेम्पोच्या अपघातात ऊसतोड मजूर ज्योतीराम सुनील मिसाळ रा. वय 24 कोल्हेवाडी ता. केज यांचा मृत्यू झाला व त्यांचे वडील सुनील ज्ञानोबा मिसाळ वय (45), आई सत्वशीला सुनील मिसाळ वय 40 हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!