मस्साजोग विभागाचे साह्यायक अभियंता घंटे म्हणजे आसून आडचण नसून खोळंबा..?
शेतकर्यांचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात घंटेंची तत्परता,तीच तत्परता जळालेले ट्रिन्सफार्मर दुरूस्ती करण्यात दिसत का..? नाही..?
शुक्रवारी विड्याच्या महावितरण कार्यालयाच्या समोर घंटेंच्या निषेधार्थ शेतकर्यांचे घंटानाद आंदोलन
रोखठोक प्रतिनिधी
एकीकडे गोगलगायीच्या प्रादुर्भाव तर दुसरीकडे निसर्गाच्या लहरी पणामुळे झालेल्या अतिवृष्टीने शेतकरी पुरता हातबल झाला आहे.त्यातच मस्साजोग विभागात साहाय्यक अभियंता पदावर कार्यरत आसलेले घंटे यांनी शेतकर्यांच्या पिकांची उरली सुरली वाट लावण्याचे धोरण राबवले आसून विज तोडणीच्या कामात तत्परता राबवली आहे.परंतू विज तोडणीस जेवढी तत्परता आहे.तेवढीच तत्परता जळालेले ट्रान्सपर दुरूस्तीच्या वेळेत घंटेंना दाखवता येत का..? नाही हा जरी प्रश्न असला तरी साह्यक अभियंता घंटेंचा कार्यकाळ पूर्णपणे वादग्रस्त झाला आहे.शेतकर्यांच्या वतिने विडा येथिल महावितरण कार्यालयाच्या समोर घंटेंच्या निषेधार्थ घंटानाद आंदोलन करण्यात येत आहे.तरी आंदोलनात सर्व शेतकर्यांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
केज तालुकायातील मस्साजोग विभागात कार्यरत आसलेले साह्यक विद्युत अभियंता घंटेंची कामगिरी पाहिली तर मागील काही दिवसांपासून वादग्रस्त ठरताना दिसत आहे.यामध्ये साहाय्यक अभियंता घंटे म्हणजे या विभागातील शेतकर्यांना असून आडचण आसून खोळंबा या महणीप्रमाणे झाली आहे.मागील खरीप हंगामात गोगलगायच्या प्रादुर्भावामुळे व अतिवृष्टीने घातलेल्या थैमानामुळे शेतकरी पुरता हैराण झाला आहे.त्यातच रब्बी हंगामाची पेरीणी संपुष्टात येते-न येती तोच शेतकर्यांचा शेतीचा विजपुरवठा खंडीत करण्यात येत आहे.परंतू मस्साजोग विभागाचे साह्यक अभियंता घंटे यांच्या एवढी तत्परत्ता ईतर अधिकार्यांकडे दिसून येत नाही.दरम्यान साह्यक अभियंता घंटेंची तत्परता कौतुकास्पद आहे. परंतू तीच तत्परता शेतकर्यांचे ट्रान्सफर जळालेले दुरूस्त करण्यात का ..? नाही असाच प्रश्ण आहे.त्यातच विभागातील काही गावे सिंगल फेजचे ट्रान्सफर जळाले आसल्याने महिनाभरापासून अंधारात आसताना देखिल रिपोर्ट देण्यास साहाय्यक अभियंता घंटेंची तत्परता कुठे जाते..?तसेच रिपोर्ट देण्यास येवठा विलंब का..? होतो हा तिसरा प्रश्ण शेतकर्यांकडून उपस्थित होत आहे.शुक्रवारी सर्व शेतकर्यांच्या वतिने विड्यातील महावितरण विभागाच्या कार्यालयासमोर घंटेंच्या निषेधार्थ घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे.तरी सर्व शेतकर्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
चौकट
विडा 33 केव्ही अंर्गत गावांमध्ये एक तास लाईट दाखवा बक्षिस मिळवा- डाॅ.धनराज पवार
शेतकर्यांचा रब्बी हंगाम सुरू होताच महावितरणने विज तोडणीस सुरूवात केली आहे.परंतू महावितरणचे अधिकारी शेतकर्यांना कितपत विज देतात हे सुध्दा पाहणे तितकेच महत्वाचे आहे.विडा 33 केव्ही अंतर्गत गावांमध्ये 15 ते 20 मिनिटाला विज गायब होते.त्यामुळे एक तास कायम विज पुरवठा दाखवा आणी बक्षिस मिळवा असे आव्हान विडा ग्रा.पं.सदस्य डाॅ.धनराज पवार यांनी केले आहे.