• Sun. Apr 19th, 2026

जिथे छटाक भर पुलाचा फोटो टाकुन उदो उदो केला तिथे 100 मिटर नाली स्वखर्चाने नगरसेविकेने बांधली.

Bybaba maske

Nov 18, 2022

जिथे छटाक भर पुलाचा फोटो टाकुन उदो उदो केला तिथे 100 मिटर नाली स्वखर्चाने नगरसेविकेने बांधली.

रोखठोक वार्ताहर 

केज वार्ड क्रमांक 11 च्या बसस्थानकाच्या पाठीमागील भागातील नालीचा विषय बर्‍याच दिवसांपासून रखडलेला होता,तो विषय नगरसेविका तरमिमबेगम गजमफर इनामदार यांनी 100 फुट नाली स्वखर्चाने बांधून देत तात्काळ सोडवला.एकीकडी स्वपक्षाच्या नगरसेविकेला वॉर्डातील कामा साठी कुठलाही निधी दिली जात नसताना नगराध्यक्ष स्वतःच्या वार्डातील पुल, नालीवर पत्रा टाकुन त्याच्या वर जाळी टाकुन सिमेंट काँक्रिट टाकुन चुकीच्या पध्दतीने करत असलेल्या पुलाची वर्तमानपत्रात वहा वहा करून घेत असताना व केज शहरातील सर्व लोकानुनय असलेली कामे ठप्प असताना,ऐन हिवाळ्यात बोर बंद,नळाला पंधरा दिवसांत एकदा पाणी नगरपंचायत देते.आश्या वेळी  तरमिमबेगम गजमफर इनामदार सारख्या नगरसेविकेने वार्डातील जनतेच हित जपणाऱ्या स्वखर्चातुन नाली बांधकाम करून दिल्या बद्दल, वजाद भाई खुरेशी, सागर काळे,हकिम भाई,शिवाजी सौदागर,जिवन भाऊ,व सगळ्या नागरिकांनी मिळून आभार व्यक्त करत आहेत.

चौकट

केज विकास संघर्ष समितीचा उमरी रोड व वार्ड क्रमांक आठ (8) मधील काम सुरू करण्याच्या अल्टीमेट ला सतरा दिवस झाले.अजून पंर्यत नगरपंचायत ने ना निवेदा काढली ना कुठली हालचाल दिसुन येत नाही 13 दिवसात नगरपंचायत काय करते या कडे सर्व केज शहरातील नागरिकाचे लक्ष लागले आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!