• Sun. Apr 19th, 2026

केज नगरपंचायत मध्ये सत्तांतर होणार ?

Bybaba maske

Nov 24, 2022

केज नगरपंचायत मध्ये सत्तांतर होणार?

काँग्रेस पाठींबा काढणार का?

रोखठोक स्पेशल 

केज नगरपंचायत मध्ये जनविकास परिवर्तन आघाडी व काँग्रेस यांनी नगरपंचायत निवडणुक वेगळी लढविली पण बहुमत कोणालाच मिळाले नाही.राष्ट्रवादी कॉंग्रेस ला पाच(5) जागा जनविकास परिवर्तन आघाडीला व रमेश आडसकर यांचा गट या दोघांना आठ जाग(8) त्यात जनविकास च्या सहा तर आडसकर गटाच्या दोन.व काँग्रेस तीन जागांवर विजयी झाले तर एक अपक्ष.पण वैयक्तिक येडेश्वरी साखर कारखान्याचे चेअरमन बंजरग सोनवणे यांना वेगळ ठेवून “आमच गाव आमचा विकास” हे ब्रीद वाक्य घेऊन जनविकास च्या प्रमुखांनी खासदार रजनीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करू व नगरपंचायत चालवु याची हमी देऊन नगरपंचायत वर जनविकास आघाडीचा नगराध्यक्ष व काँग्रेस चा उपनगराध्यक्ष असी सत्ता मिळवली.पण आज जनविकास परिवर्तन आघाडीकडून शिंदे गटात जाण्याची तयारी झाली आहे, अशी सुत्राकडून समजते. त्या मुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीत फुट पाडून शिंदे यानी भाजपा बरोबर सरकार स्थापन केल. त्या मुळे शिंदे गटाने काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस सहित शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसल्याची भावना झाली आहे.त्यामुळे जर जनविकास आघाडी शिंदे गटात प्रवेश करत असतील तर स्थानिक पातळीवर काँग्रेस त्यांचा पाठींबा ठेवेल का? जर राष्ट्रवादी बरोबर जायचे असेल तर बंजरग सोनवणे यांना “आपल गाव आपला विकास” म्हणून सत्ते बाहेर ठेवल. बजरंग सोनवणे हे आपल्या मुलीचा केलेल्या पराभवाच शल्य विसरून जनविकास ला पाठींबा देतील का? जनविकास आघाडीच्या गळाला काँग्रेस,राष्ट्रवादीचे नगरसेवक  लागलेत का? ते येत्या काळात पहाणे उत्कंठावर्धक असेल.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!