• Mon. Apr 20th, 2026

पत्रकार दशरथ चवरे यांची मराठा फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य च्या केज तालुका अध्यक्षपदी निवड.

Bybaba maske

Nov 25, 2022

पत्रकार दशरथ चवरे यांची मराठा फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य च्या केज तालुका अध्यक्षपदी निवड.

केज! प्रतिनिधि

झुंजार पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष, शिवानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष व दै, हिन्द जागृतीचे पत्रकार दशरथ चवरे यांची मराठा फाउंडेशन महाराष्ट्र राज्यच्या केज तालुका अध्यक्षपदी निवड झाली.

सोनीजवळा ता. केज येथील झुंजार पत्रकार संघाचे मा. अध्यक्ष तसेच केज मधील जेष्ठ पत्रकार दशरथ चवरे यांची समाजाविषयी काम करण्याची धडपड व एकनिष्ठता पाहून मराठा फाऊंडेशनचे संस्थापक मा. श्री,अध्यक्ष बापूसाहेब जाधव यांनी मराठा फाऊंडेशनच्या केज तालुका अध्यक्षपदी निवड केली आहे, शिवानंद प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष यांनी आजपर्यंत समाजाविषयी जिद्दीने व एकनिष्ठतेने केलेले काम पाहून त्यांची हि निवड करण्यात आली आहे मराठा समाजावरील तसेच विधार्थ्यावरील अन्याय दूर करून न्याय देण्याचे काम अगदी प्रामाणिक पणे करण्याचे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार मराठा समाजात तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम एकनिष्ठपणे करण्याचे आश्वासन पत्रकार श्री दशरथ चवरे यांनी दिले यावेळी संघटनेचे अध्यक्ष मा.बापूसाहेब जाधव, प्रदेश सचिव, मा. रविंद्रधुमाळ, दै, पाश्र्वभूमिचे, पत्रकार रमेश गुळभिले ऊपस्थित होते त्यांच्या या निवडीबद्दल केज तालुक्यातील पत्रकार मित्रामधुन तसेच सकल मराठा समाजातून मा. श्री दशरथ चवरे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!