• Sat. Jun 20th, 2026

राहूल गांधीची राहूल(मास्स)शिंदे ने घेतली भेट. एक सामान्य काँग्रेस चा कार्यकर्ता भेटू शकतो राहूल गांधी बरोबर.

Bybaba maske

Nov 25, 2022

राहूल गांधीची राहूल(मास्स)शिंदे ने घेतली भेट. एक सामान्य काँग्रेस चा कार्यकर्ता भेटू शकतो राहूल गांधी बरोबर.

रोखठोक वार्ताहर 

काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर पर्यंत भारत जोडो पदयात्रा काढली असून नुकतीच ती यात्रा महाराष्ट्रात चौदा दिवसात नांदेड जिल्ह्यातील देगलुर येथून प्रवेश करून पुढे हिंगोली – वाशिम – अकोला – बुलढाण्यातील जळगाव – जामोद मार्गे जवळ – जवळ चारशे कि.मी. प्रवास करून काल मध्यप्रदेश मध्ये दाखल झाली आहे.

या यात्रेमध्ये खासदार रजनीताई पाटील, माजी मंत्री अशोकराव पाटील, युवा नेते आदित्य पाटील जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, उपाध्यक्ष राहुल सोनवणे, युवा नेते पशुपतीनाथ दांगट कपिल मस्के यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात धडाडीने काम करणारा युवक

भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याचा पन मनासी घेऊन केज शहरातील एक सामान्य काँग्रेस कार्यकर्ता नांदेड ते बुलढाणा असा प्रवास करत होता,राहूल सारखे असंख्य लोक राहूल गांधी सोबत चालत आहेत पण सगळ्याच नशीब असे नाही की राहूल गांधीची भेट होईल पण अश्या लाखो लोकातुन केज शहरातील राहूल उर्फ मास्स यांची राहूल गांधीची भेट झाली फक्त भेटच नाहीतर त्यांच्या सोबत हातात हात घेऊन कांही अंतर चालण्याच भाग्य सुद्धा लाभल.भावी पंतप्रधान बरोबर चालण्याच हे स्वभाग्य कायम स्मरणात राहील असे राहूल शिदे हा युवक म्हणतोय.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!