• Wed. Apr 22nd, 2026

वंचितबहुजनपरिवर्तनआघाडीच्या उमेदवाराना विजयी करा

Bybaba maske

Nov 25, 2022

 वंचितबहुजनपरिवर्तनआघाडीच्या उमेदवाराना विजयी करा

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा (सिनेट)च उद्या मतदान…

बीड/प्रतिनिधी

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अधिसभा (सिनेट) निवडणुकीच्या निमित्ताने यंदाची विद्यापीठाची अधिसभा (सिनेट) निवडणूक तथया दृष्टिकोनाने अत्यंत महत्वाची ठरणार आहे.उच्च शिक्षण क्षेत्रातील आव्हाना बरोबर नवीन शैक्षणिक धोरणांनाची अंमलबजावणी गतिमान पद्धतीने व पारदर्शकतेने करणे वाय कालावधीत होईल अशा परिस्थितीत या विद्यापीठाला योग्य दिशा देणारी व शैक्षणिक क्षेत्राची जाणीव असलेल्या प्रतिनिधीचा निर्णय प्रक्रियेतील सहभाग अत्यंत महत्वाचा आहे अशा महत्वाच्या पार्श्वभूमीवर 2022 च्या होणाऱ्या विद्यापीठाच्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका वंचित बहुजन परिवर्तन आघाडी लढवत आहे.

विद्यापीठे ही राजकारणाचा अड्डा न बनता राष्ट्रकारण व समाजकारण करण्यामध्ये आग्रहपूर्वक अग्रेसर राहिली पाहिजे यासाठी दक्ष राहून योग्य निर्णय करून घेणे ही विद्यापीठ विकास मंचाची उच्च शिक्षण क्षेत्रातील सर्व संबंधिताकडून अपेक्षा आहे.त्यासाठी विदयापीठ विकास मंच आग्रहपूर्वक प्रयत्न करीत आहे.शिक्षण क्षेत्रात योग्य दिशा देणारी ही भूमिका प्रत्यक्ष व्यवहारात आणण्यासाठी निर्णय प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी होऊन त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी विद्यापीठ विकास मंचाची आहे.परिवर्तनाच्या या प्रक्रियेत कर्तव्य भावनेने प्रयन्त करत राहण्याची मानसिकता विद्यापीठ विकास मंचाच्या सर्व सदस्यांची आहे.उच्च शिक्षणातून होणारे प्रयत्न व नवनविन प्रयोग हे या देशातील पिढी घडवणारे एक साधन आहे.प्रत्येक उच्च शिक्षित विदयार्थ्याला आपली बुद्धी आणि कर्तुत्व भारत मातेच्या सेवेत समर्पित करण्यासाठी संस्कार देणारे गुरुकुल म्हणजे विदयापीठ होय.अशा व्यापक विचाराने विद्या क्षेत्रात कार्य करावे हा वंचित बहुजन परिवर्तन आघाडी प्रयत्न.

तसेच महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठाच्या अधिकार मंडळा मध्ये विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून निश्चित भूमिका बजावणाऱ्या आणि उच्चशिक्षण क्षेत्रात राष्ट्रहिताच्या भावनेतून काम करणाऱ्या कार्यकत्यांचा मंच म्हणजेच वंचित बहुजन परिवर्तन आघाडी होय.गतवर्षी विदयापीठ अधिसभा (सिनेट) निवडणुकीत वंचित बहुजन परिवर्तन आघाडी अधिक सदस्य निवडून यावे यासाठी आपण केलेले प्रयत्न व मतदान याचे फलित म्हणून अनेक प्राधिकरण/ समित्यानंवर निवडून गेल्यावर काम करत असताना विदयापीठाचा विकास व पर्यायाने उच्च शिक्षणाचा विकास हेच ध्येय डोळ्या समोर ठेवून कामकाजात गतीमानता व पारदर्शता आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले गेले.

यापुढे ही विद्यार्थ्यना गृहित न धरता निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेऊन निर्णय करणे, उम्र शिक्षणातील विद्यार्थी,प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थाचालक इ. सर्व घटक मिळून प्रयत्न करणे आणि यातून उच्चशिक्षणा समोरील आव्हाने सहज पेलता येण्याजोगी परिस्थिती निर्माण करणे या भूमिकेतून निवडून येणारे प्रत्येक सदस्य प्राधिकरणामधील आपापली जबाबदारी कर्तव्यपूर्वक पार पाडतील यासाठी वंचित बहुजन परिवर्तन आघाडी कटिबद्ध आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अधिसभा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत विद्यापीठ विकास मंचाचे खालील प्रमाणे उमेदवार असतील.

◆प्रा.प्रकाश दादाराव इंगळे,औरंगाबाद,खुला प्रवर्ग प्राध्यापक.अँड.पंकज बनसोडे, औरंगाबाद,खुला प्रवर्ग,व्यवसायिक.नितीन फंदे,बीड,खुला प्रवर्ग शिक्षक.अनिस शफिक तडवी,औरंगाबाद,खुला प्रवर्ग,संशोधक विद्यार्थी.विलास सरकटे,जालना,खुला प्रवर्ग.अँड.नंदा गायकवाड,औरंगाबाद,महिला वकील.रोहित जोगदंड,औरंगाबाद,अनुजाती पत्रकार(युट्युब).डॉ.भागवतबर्डे,जालना,अनु.जमाती,संशोधक विद्यार्थी,विनोद आघाव, औरंगाबाद,भटक्या विमुक्त जमाती,व्यवसायिक या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजय करा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे,जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे,केज शहर अध्यक्ष बाबासाहेब मस्के,शहर उपाध्यक्ष उत्तम वाघमारे.यानी केले आहे.

baba maske

Related Post

कानडी रोडकडे दुर्लक्ष? नागरिकांचा संताप; पुढाऱ्यांवर सवाल यश कन्स्ट्रक्शन कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभागाने या भागाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले?
ऽऽबस झाल्या घोषणांच्या रिकाम्या तुताऱ्या; आता हव्यात कार्यान्वित मुताऱ्या..! “सामुदायिक मूत्रविसर्जन” आंदोलनाची चर्चा जोरात
केज नगरपंचायतीचे दुर्लक्ष; नागरिकांना मोकाट कुत्र्यांच्या तावडीत सोडल्याचा आरोप. पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्याला १० दिवस उलटले; अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना नाही. कुत्र्याने ४० नागरिकांवर हल्ला करत अनेकांना जखमी केले होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!