• Wed. Jun 3rd, 2026

पुतण्याने केला कोयत्याने हल्ला चुलता ठार चुलती गंभीर.

Bybaba maske

Nov 26, 2022
the word murder handwritten on wet glass of night window with bloody red back light of street lights.

पुतण्याने केला कोयत्याने हल्ला चुलता ठार चुलती गंभीर.

रोखठोक वार्ताहर 

 वडवणी तालुक्यातील मौजे पिंपरखेड येथे घरगुती वादातून चुलत्याने पुतण्याचा खून केल्याची घटना ताजी असताना आता बीड तालुक्यातील मुळुकवाडी येथे पुतण्याने जमिनीच्या वादातून चुलता-चुलतीवर कोयत्याने हल्ला केल्याची घटना शनिवारी (दि.२६) सकाळी घडली आहे. या हल्ल्यात बळीराम मसाजी निर्मळ (वय-८०) यांचा मृत्यु झाला असून त्यांच्या पत्नी केसरबाई बळीराम निर्मळ (वय ७०) यांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान आरोपी रोहिदास विठ्ठल निर्मळ (वय ५०) हा फरार असून नेकनूर पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

वडवणी तालुक्यातील मौजे पिंपरखेड येथे दोन दिवसापूर्वी घरगुती वादातून चुलत्याने पुतण्याचा खून केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. दरम्यान शनिवारी मुळुकवाडी येथे रोहिदास विठ्ठल निर्मळने जमिनीच्या वादातून आपल्या चुलता आणि चुलतीवर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. यात बळीराम मसाजी निर्मळ यांचा मृत्यु झाला असून केसरबाई निर्मळ गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती आहे. घटनास्थळी नेकनूर पोलीस ठाण्याचे एपीआय शेख मुस्तफा, पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव, पीएसआय पानपाटील, लिंबागणेश पोलीस चौकीचे पोहे. डीडुळ पोना. सचिन मुरुमकर यांनी भेट देऊन पंचनामा केला. आरोपी अद्याप फरार असून पोलीस पुढील तपास करीतआहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!