मांडी खाली दडवलेला एक कोटी 33 लाखाचा निधी नगरपंचायत कडून सुटेना.उमरी रोड, वार्ड क्रमांक आठ चा रस्ता काही बनेना.
रोखठोक वार्ताहर
केज नगरपंचायत ला उमरीरोड व वार्ड क्रमांक आठ साठी एकुण एक कोटी 33 लाख निधी गेल्या मार्च महिन्यात आला होता पण गेल्या आठ, नऊ महिण्या पासुन आलेला निधी नगरपंचायत ने उघड केला नाही.रोखठोक न्युज ने याची बातमी केल्या नंतर खडबडून जागे झालेले समाजसेवक नगरपंचायत ला जाब विचारू लागले त्या वेळेस कोठे केजच्या नागरिकाला या बाबत कळाले.त्या नंतर गेल्या वीस वर्षांपासून अंदोलन करणारे हनुमंत भोसले सरांनी उमरीरोड चे काम तात्काळ चालु करावे नसता आंदोलनाचा इशारा दिला पण एक महिन्यात काम चालु करू असे आश्वासन देऊन बोळवण केली पण आता पुन्हा एकदा समाजसेवक हनुमंत भोसले सरांनी दि.5 डिसेंबर 2022 रोजी पुन्हा एकदा नगरपंचायत ला आंदोलनाचा इशारा दिला आहे.गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलकांना कुल्फी देणारी नगरपंचायत आता या 5/12/2022 रोजी च्या आंदोलनाच्या इशाऱ्याला पुन्हा कुल्फी देते का उमरीरोड व वार्ड क्रमांक आठ च्या रस्त्याचे काम करते हे पाहणे नागरिका कुतूहलाचे ठरेल.
चौकट.
आलेला निधी गेल्या आठ महिन्यांपासून खर्च करता येईना ? आम्हाला निधी मिळू देत नाही असे ओरड करणारे सत्ताधारी.उमरीरोड व वार्ड क्रमांक आठ विषयावर बोलतीबंद करून बसले आहेत.