केज नगरपंचायत च्या भ्रष्ट कारभाराचा नमुना,बांधकाम परवाना नसताना बांधकाम चालू.
कोणाच्या आशिर्वादाने न्यायालयीन आदेश असताना गायरानात बांधकाम चालू?
रोखठोक वार्ताहर
केज येथील केज बीड महामार्गावरील गायरान जमिनीचे बेकायदेशीरपणे संगनमताने अतिक्रमण नियमानुकूल करून त्याची अदलाबदली करून प्लॉट विक्री केल्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने १५ फेब्रुवारी पर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. तरी ही नगरपंचायत च्या आशीर्वादाने सर्वे नंबर 30/1 मध्ये नगरपंचायत चा बांधकाम परवाना नसताना बांधकाम चालु आहे.या आगोदर सुद्धा रोखठोक न्युज ने दहा दिवसा पुर्वी अवैध बांधकाम विषयी बातमी प्रकाशित केली होती. पण कुठल्या ओज्या खाली का दबावा खाली नगरपंचायत साधी चौकशी सुद्धा करत नाही.30/1 या सर्वे नंबर मध्ये प्रतिष्ठीत व्यक्ती ने प्लॉट असल्या कारणाने हे अवैध बांधकाम हे फक्त सिनेमाच ट्रेलर आहे.एकदा ट्रेलर कोणी अडवल नाही की तिथे सरास बांधकाम होणार.व जाग्या वर कब्जा करणार असी चर्चा केज शहरातील नागरिक करत आहेत.न्यालयाने 15 फेब्रुवारीपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी करण्याचे आदेश असताना.केज तहसीलदार,नगरपंचायत चे मुख्याधिकारी गप्प का आहेत असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे.याच्या कुणाचे उखळ पांढरे झाले आहे याचा शोध सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांकडून घ्यावा अशी मागणी जनतेतून होत आहे.