गावकारभाऱ्यांची उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी प्रचंड गर्दी
गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचे अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी तहसील कार्यालयात प्रचंड गर्दी झाली होती.
केज तालुक्यातील ६६ ग्राममपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तहसील कार्यालयाच्या परिसरात उमेदवार आणि त्यांचे समर्थक यांनी प्रचंड गर्दी दिसून आली आली. काही गावात एकास एक लढती होत आहेत; तर काही ठिकाणी तिरंगी आणि बहुरंगी लढती देखील होऊ शकतात. परंतु उमेदवारी अर्ज मागे घेतल्या नंतर चित्र स्पष्ट होईल.
दरम्यान या निवडणूक प्रक्रियेवर तहसीलदार तहसीलदार दुलाजी मेंडके, निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार सचिन देशपांडे, प्राधिकृत अधिकारी नायब तहसीलदार लक्ष्मण धस आणि ननवरे यांच्यासह निवडणूक निर्णय अधिकारी काम पहात आहेत. या वेळी तहसील कार्यालयाच्या परिसरात सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग आणि पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे व पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला.