• Sat. Apr 25th, 2026

केज तालुक्यात लाईनमनला धक्का बुक्की करून सरकारी कामात अडथळा

Bybaba maske

Dec 2, 2022

केज तालुक्यात लाईनमनला धक्का बुक्की करून सरकारी कामात अडथळा

रोखठोक न्युज 

गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यातील उमरी येथे कर्तव्यावर असलेल्या लाईनमनला एकाने धक्का बुक्की करून सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

या बाबतची माहिती अशी की, शुक्रवार दि. २ डिसेंबर रोजी वीज वितरण कंपनीचे विशाल गायकवाड हे उमरी येथे लाईट बिल वाटप करीत असताना अरूण लिंबा शिंपले रा. उमरी याने त्याना शिवीगाळ केली. तसेच विशाल गायकवाड यांच्या गच्चीला धरून हातातील लाईट बिले फेकून देत सरकारी कामात अडथळा आणला.

या प्रकरणी लाईनमन विशाल गायकवाड यांच्या तक्रारी वरून केज पोलीस ठाण्यात अरूण लिंबा शिंपले रा उमरी याच्या विरुद्ध गु. र. नं ५५४/२०२२ भा दं वि ३५३, ३२३ आणि ५०४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग हे पुढील तपास करीत आहेत

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!