जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषणार्थीचा थंडीने कुडकूडून मृत्यू !!
रोखठोक वार्ताहर बीड
लालफितशाही चा कारभार आणि प्रशासन किती गेंड्याच्या कातडीच असतं याचा नमुना बीडमध्ये पाहायला मिळाला आहे. हक्काचे घरकुल बांधून मिळावे तसेच उरलेले हप्ते मिळावेत यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात उपोषणाला बसलेल्या एका उपोषणार्थीकडे लक्ष द्यायला जिल्हाधिकारी आणि प्रशासनाला वेळ मिळाला नाही त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या दारातच थंडीने कुडकुडत या उपोषणार्थी व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे या मृत्यूला स्वतः जिल्हाधिकारी जबाबदार की प्रशासन आणि त्यांची दिरंगाई याची चौकशी होणे गरजेचे आहे .
आप्पाराव भुजाराव पवार हे वासनावाडी येथील रहिवासी गेल्या दोन दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते शासनाने मंजूर केलेले घरकुल तातडीने बांधून देण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी पवार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात उपोषण करत होते मात्र या उपोषणावरती व्यक्तीची साधी दखलही घ्यायला जिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा यांच्यासह प्रशासनाला वेळ मिळाला नाही नेमकं जिल्हाधिकारी आणि त्यांचे सहकारी अधिकारी एवढ्या कोणत्या महत्त्वाच्या कामात व्यस्त होते हे कळायला मार्ग नाही दरम्यान पवार यांचा सकाळी मृत्यू झाल्याचे उघड झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे
पवार यांचा मृतदेह दोन ते तीन तास उपोषण स्थळीच होता ना तिथे पोलीस आले ना जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर जिल्हा प्रशासनातील अधिकारी पवार यांच्या मृत्यूला जिल्हा प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केलाय वारंवार निवेदने आणि अर्ज देऊन देखील त्यांच्या मागणीकडे अक्षम्य दुर्लक्ष केले गेले त्यामुळेच त्यांच्यावर उपोषणाची वेळ आली आणि अखेर थंडीने कुडकुडल्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असा आरोप नातेवाईकांनी केलाय
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पोलीस कक्ष आहे आंदोलन करते उपोषण करते यांना थेट जिल्हाधिकारी कार्यालयात न जाऊ देता पोलीस संरक्षणात त्यांना जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी या पोलीस चौकीतील कर्मचाऱ्यांचे असते मात्र पुजारी आपली गायब होते की काय अशी चर्चा आता सुरू झाली आहे