• Sun. Apr 19th, 2026

मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त केज तालुक्यातील पत्रकारांची आरोग्य तपासणी संपन्न  

Bybaba maske

Dec 3, 2022

मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त केज तालुक्यातील पत्रकारांची आरोग्य तपासणी संपन्न

रोखठोक न्युज 

केज तालुक्यातील २० पत्रकारांनी केली उपजिल्हा रुग्णालयात अरोग्य तपासणी..

सविस्तर वृत्त असे कि मराठी पत्रकार परिषदेच्या 84 वा वर्धापन दिनानिमित्त केज तालुक्यातील सर्व पत्रकारांचे आरोग्य शिबीरांचे आयोजन उपजिल्हा रुग्णालय केज येथे करण्यात आले होते. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक संजय राऊत यांच्या मार्गदर्शखाली पत्रकारांची आरोग्य तपासणी पूर्ण झाली तपासणीमध्ये ECG,HIV सह सर्व रक्त चाचण्या , दंत व मुखआरोग्य इत्यादी तपासण्या करूण यावर डॉक्टर संजय राऊत फिजीशीयन तथा वैद्यकिय अधिक्षक यांनी रोग निदान केले. त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने सर्व पत्रकारांचा सत्कार कार्यक्रम आयोजीत करून पत्रकार विजय आरखडे , पत्रकार अजय भांगे , पत्रकार रामदास तपसे , पत्रकार दत्तात्रय हांडिबांग यांनी आभारपूर्व मार्गदर्शन केले तसेच अध्यक्षीय समारोप प्रसंगी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.संजय राऊत यांनी धगधगत्या जीवनात आरोग्याची काळजी कशी घेतली पाहिजे यावर आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी पत्रकार महादेव काळे यांचा वाढदिवसही साजरा करण्यात आला या आरोग्य शिबीरास धनंजय कुलकर्णी ,पत्रकार रामदास तपसे , पत्रकार दिनकर राऊत , पत्रकार गौतम बचुटे , पत्रकार विजय आरकडे , पत्रकार महादेव दळवे , पत्रकार बाबासाहेब मस्के , पत्रकार दशरथ चवरे , पत्रकार मुबशीर खतीब , पत्रकार अजय भांगे, पत्रकार शिवाजी औसेकर,पत्रकार अनिल वैरागे,पत्रकार अनिल गलांडे, पत्रकार गणेश सत्वधर, पत्रकार हांडीबाग दत्तात्रय, पत्रकार रंजीत घाडगे, पत्रकार महादेव काळे,पत्रकार चंद्रकांत पाटील,पत्रकार तात्या गवळी इत्यादी उपस्थित होते.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!