• Sun. Apr 19th, 2026

उद्या घंटानाद…का..कुल्फी..? केज विकास संघर्ष समीती नाव बदला,उमरीरोड संघर्ष समीती करा!!  

Bybaba maske

Dec 4, 2022

उद्या घंटानाद…का..कुल्फी..? केज विकास संघर्ष समीती नाव बदला,उमरीरोड संघर्ष समीती करा!!

रोखठोक वार्ताहर 

उद्या दिनांक 5/डिसेंबर/2022 पासुन केज विकास संघर्ष समिती उमरीरोड चे काम चालू करावे या साठी नगरपंचायत केज समोर घंटानाद आंदोलन करणार आहे.गेल्या मार्च महिन्या पासुन 98 लाखाचा निधी मांडी खाली दाबून बसलेल नगरपंचायत च प्रशासन ना निवेदा काढण्यास तयार आहे ना काम करण्यास.गेल्या वीस वर्षांपासून चालु असलेला हा लढा कोठे थांबेल? ज्या जनविकास परीवर्तन आघाडी कडुन उमेदवारी घेऊन लढले ते हनुमंत भोसले सर यांनाच सत्तेत आल्यावर जनविकास परिवर्तन आघाडीने चुना लावला की काय हा प्रश्न जनता विचारत आहे.आता पंर्यत मिहीन्याचा दिलेला अल्टीमेट उद्या संपत आहे.उद्या पासुन नगरपंचायत समोर घंटानाद आंदोलन होत की नगरपंचायत पुन्हा एकदा “कुल्फी ” देत? आता हे उद्या कळेल!!

केज विकास संघर्ष समीती ने आपले नाव बदलून उमरीरोड संघर्ष समीती करावे अशी मागणी वार्ड क्रमांक आठ चे नागरिक करत आहेत कारण वार्ड क्रमांक आठ हा केज नगरपंचायत हद्दीत असुन ही केज विकास संघर्ष समीती उमरीरोड बरोबर आलेला 35 कोटीच्या निधीवर एक अवाक्षर सुद्धा काढत नाही मग यास केज विकास संघर्ष समीती का म्हणायचे? असा प्रश्न वार्ड क्रमांक आठ चे नागरिक विचारत आहेत.हा वार्ड जनविकास परिवर्तन आघाडी चे सर्वेसर्वा यांच्या पत्नी निवडून आल्या असताना, या रोडचे काम अद्याप का सुरू केले नाही असा जनता विचारू लागली आहे.उमरीरोड बरोबरच आमच्या हक्काचा निधी आम्हाला देऊन नगरपंचायत ने लवकरात लवकर रस्त्याचे काम सुरू करावे अशी मागणी वार्ड क्रमांक आठ चे नागरिक करत आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!