• Fri. Jun 5th, 2026

एक लाख रुपयांसाठी विवाहिताचा शारीरीक मानसिक छळ ; दहा जनाविरुद्ध गुन्हा दाखल

Bybaba maske

Dec 4, 2022

एक लाख रुपयांसाठी विवाहिताचा शारीरीक मानसिक छळ ; दहा जनाविरुद्ध गुन्हा दाखल

रोखठोक वार्ताहर 

केज तालुक्यातील साळेगाव येथील 30 वर्षीय विवाहितेचा एक लाख रुपयासाठी वाजरखेडा, जि.लातुर येथील सासर कडील मंडळीने शारीरिक मानसिक छळ केला ; केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

सविस्तर वृत्त असे कि केज तालुक्यातील साळेगाव येथील पुजा बालाजी मस्के वय 30 वर्षे, व्यवसाय- घरकाम हिला (सासरकडील मंडळीने ) तुझ्या माहेरवरून एक लाख रुपये घेऊन ये व शेताचा हिस्सा घे म्हणत शिवीगाळ करून मारहाण करून उपाशी पोटी ठेवुन ,शारिरीक व मानसीक त्रास देवुन जाच जुलुम करून जिवे मारण्याची धमकी दिली म्हणुनआरोपी – 1) बालाजी रामा मस्के (पती) 2) पदमीन रामा मस्के (सासु ) 3) आहील्या सुधाकर गायकवाड (ननंद) 4) सावित्रा बालाजी मगर (ननंद ) 5) आरूणा पप्पु भडंगे (ननंद ) 6) करूणा बालाजी गालफाडे (ननंद ) 7) बालाजी गालफाडे (नंदावा ) 8) राहुल बालाजी मगर (भाच्चा) 9) गणेश सुधाकर गायकवाड (भाच्चा) 10) कोमल बालाजी मगर (भाच्ची) सर्व रा. वाजरखेडा ता.जि.लातुर यांच्या विरुद्ध केज पोलिस ठाण्यात गुरनं 556/2022 कलम 498 अ, 323, 504, 506, 34 भादंवी प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

पुढील तपास सपोनि शंकर वाघमोडे यांच्या आदेशाने मपोना. गंभीरे हे करत आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!