• Sat. Apr 25th, 2026

*हॉटेलमध्ये दहशत निर्माण करून वेटरला मारहाण*

Bybaba maske

Dec 4, 2022

 

हॉटेलमध्ये दहशत निर्माण करून वेटरला मारहाण

रोखठोक न्युज 

गौतम बचुटे/केज :- साळेगांव ता. केज येथे हॉटेलमध्ये दारुड्यांनी अश्लील शिवीगाळ करून एका वेटरला मारहाण करून अन्नाची नासधूस करून नुकसान केले.

केज-कळंब रोडवर साळेगाव येथे गांजी पाटीवर शंकर विद्यालया जवळ शेख सादेक यांचे मराठा मटण खानावळ नावाचे जेवणाचे हॉटेल आहे. रविचार दि. ४ डिसेंबर रोजी सायंकाळी ६:०० वा. च्या दरम्यान हॉटेलमध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथील करण घिसाडी आणि त्याचे सोबत इतर तिघे असे चौघे जण दारू पिऊन जेवण करण्यासाठी आले होते. ते आपसांत अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ करीत होते. म्हणून हॉटेलमध्ये वेटरचे काम करीत असलेला वैभव घाटूळे त्यांना म्हणाला की, अशा वाईट शिव्या देऊ नका. येथे महिला काम करीत आहेत. असे म्हणताच दारुड्यानी वैभव घाटूळे यास मारहाण केली. तसेच हॉटेल मालक शेख सादेक यालाही मारहाण केली. त्यांनी लाथा मारून किचनची भिंत पाडली आणि तेथील सामान अस्तव्यस्त करून अन्न फेकून नुकसान केले. त्या नंतर त्यांनी काही साथीदार कळंब येथून बोलावून घेतले आणि त्यानी हॉटेलची तोडफोड करून दहशत निर्माण करीत हॉटेल मध्ये ग्राहकांना शिवीगाळ केली.

या प्रकरणी हॉटेलचा वेटर वैभव घाटूळे यांच्या तक्रारी नुसार करण आणि त्याचे इतर साथीदार यांच्या विरुद्ध केज पोलिस ठाण्यात गु. र. नं. ५५९/२०२२ भा. दं. वि. ३२४, ४२७, ५०४ ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केज पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक चंद्रकांत काळकुटे हे पुढील तपास करीत आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!