• Sat. Apr 25th, 2026

केज च्या लाडक्या सुन,काँग्रेस च्या शान आदरणीय खासदार रजनीताई पाटील यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा.या निमित्त ताईचा अल्प परिचय.

Bybaba maske

Dec 5, 2022

केज च्या लाडक्या सुन,काँग्रेस च्या शान आदरणीय खासदार रजनीताई पाटील यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा.या निमित्त ताईचा अल्प परिचय.

रोखठोक न्युज 

आदरणीय खासदार रजनीताई पाटील यांचा विवाह मा.मंत्री आशोकदादा पाटील याच्या बरोबर झाला आणि ताई केज च्या सुन म्हणून केज शहरात आल्या.त्या काळी आशोकदादा हे युवक काँग्रेस मध्ये काम करत होते त्याच मुळे त्यानी केज मतदानसंघास लागुन असलेला चौसाळा मतदारसंघातून विधानसभ साठी काँग्रेस पक्षश्रेष्ठी कडे टिकीट मागीतले.पण त्या काळी केज व चौसाळा मतदानसंघावर एक हाती वर्चस्व असलेले.मा.खा केशरबाई(काकू) व मा.आमदार बाबुरावजी आडसकर यांच्या मनावरच उमेदवार दिला जात असे.पण अश्या ही वेळेस आशोकदादानी हार न मानता सरळ मा.पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भेट घेऊन त्याना चौसाळा मतसंघातुन टिकीट देण्या साठी गळ घातली व टिकीट मिळवले व आमदार सुद्दा झाली आणि पहिल्याच फटक्यात महाराष्ट्राचे युवक व क्रिर्डा मंत्री म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात सामील झाले.लगेच येणाऱ्या जिल्हा परिषद मध्ये आपल्या पत्नी रजनीताई यांना जवळबन मतदारसंघातून जिल्हा परिषद सदस्य साठी उभे केले व ताई निवडून आल्या. जिल्हा परिषदे मध्ये प्रवेश झाल्या नंतर ताईचा राजकीय आलेख हा चढ्या क्रमांकाचा राहीला.त्याच वेळेस ताईचे गुण ओळखून स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबानी भाजप तर्फे बीड लोकसभेची उमेदवारी दिली व ताई भरघोस मताने विजयी झाल्या व लोकसभेत प्रवेश झाला.योगायोग असा ताई खासदार झाल्या व केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांचे आघाडीचे सरकार आले.त्याच वेळेस ताईने परळी-नगर हा खुप दिवसा पासुन प्रलंबित असलेल्या बीड वाशीयांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाला हात घातला व तत्कालीन रेल्वेमंत्री रामविलास पासवान यांना बीड जिल्यात आणून परळी-नगर रेल्वेमार्गाचे उद्घाटन केले.पण एक वर्षाच्या काळात वाजपेयी सरकार अल्पमतात आले आणि सरकार पडले.पण त्याचवेळेस आपलेला वैचारिक दृष्ट्या चुकलेला मार्ग बदलून त्या पुन्हा काँग्रेस च्या प्रव्हात सामील झाल्या.त्या नंतर आलेल्या युपीये च्या सरकार मध्ये त्याना राष्ट्रीय समाजकल्याण आयोगाचे अध्यक्ष केले.महाराष्ट्रातुन राज्यसभेवर काम करण्याची संधी दिली.हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर सारख्या राज्याच प्रभारी पद दिले.काँग्रेस ने आपल्या किचन कॅबिनेट मध्ये त्याना मानाचे स्थान दिले.आज ही त्या काँग्रेस पक्षाच्या सुकाणू समीती मध्ये आहेत.केज मध्ये ग्रामपंचायत असताना कधीही ग्रामपंचायतच्या राजकारणात लक्ष न देणारे पाटील कुटुंब नगरपंचायत झाल्या नंतर आपले चिरंजीव आदित्य पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायत च्या राजकारणात उतरले व यशस्वी राजकारण करून केज चा चेहरा बदल केला.केज च्या जातिय सिमकरणात एक मुस्लिम समाजास दलिल इनामदार यांच्या रूपात उपनगराध्यक्ष तर एक वेळेस कबीरोदिन इनामदार यांच्या रूपात नगराध्यक्ष पद दिले.केज येथील बस स्टॅंड साठी खासदार निधी एक कोटी रूपयांचा देऊन एक चांगली इमारत उभी केली आहे.धनेगाव चे पाणी केजला आण्यात आशोकदादा मंत्री असताना मंजूर केली होती.केज ग्रामीण रुग्णालय उभारण्याचे काम हे पाटील कुटुंबाच्या काळात झाले.अश्या हमेशा आपल्या गावाचा विचार करणाऱ्या आमच्या ताईसाहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.तसेच रोखठोक न्युज परिवारा तर्फे सुद्धा आपणास मंगलमय शुभेच्छा व दिर्घ आयुष्या साठी प्रार्थना.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!