विकृत मनोवृत्तीचा कळस !ज्ञान मंदिराच्या खुर्चीवर शौच करून केली नासधूस !
शाळेला काटेरी कुंपणाची आवश्यक
गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यातील एका प्राथमिक शाळेत विकृत मनोवृत्तीच्या अज्ञात व्यक्तीने शाळेच्या संरक्षक भिंतीवरून आत प्रवेश करून खुर्चीवर संडास केली आणि आतील साहित्याची तोडफोड केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे पालक तिव्र वर्गात संताप व्यक्त होत आहे.
केज तालुक्यातील साळेगांव येथे जिल्हा परिषदेची पहिली ते सातवी पर्यंत केंद्रीय प्राथमिक शाळा आहे. याच परिसरात उर्दू माध्यमाची उच्च प्राथमिक शाळा देखील आहे. येथील शिक्षकांनी परिसरात झाडे लावून शाळेचा परिसर सुंदर बनविला असून भिंती देखील बोलक्या आहेत. तसेच या पूर्वी या शाळेला आय एस ओ मानांकन देखील मिळाले आहे.
दरम्यान मागील आठवड्यात एका विकृत आणि पशु सारख्या मनोवृत्तीच्या एका अज्ञात माथेफीरूने शाळेच्या संरक्षक भिंतीवरून आत प्रवेश करून वर्गातील एक व्हील चेअर वर्गा बाहेर काढून त्यावर संडास केली. तसेच नळाची व विद्यार्थ्यांना हात धुण्यासाठी केलेल्या वॉशबेसिनची देखील मोडतोड करून नासधूस केली आहे. ही बाब शिक्षकांच्या निदर्शनास येताच त्यांनी गावातील प्रमुख व्यक्तींच्या व पालकांच्या कानावर घातली. संरक्षक भिंतीवर काटेरी तारेचे कुंपण असते तर हा प्रकार टाळता आला असता म्हणून आता शाळेच्या संरक्षक भिंतीवर काटेरी तारेची कुंपण बसविण्याची मागणी पालक वर्गातून होत आहे.
पोलिसांची तत्परता :- दरम्यान या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी पोलीस नाईक राजू गुंजाळ आणि चंद्रकांत काळकुटे यांना शाळेत पाठवून बारकाईने तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत.