• Sat. Sep 12th, 2026

धक्कादायक! केज तालुक्यातील मुख्याध्यापकाची बीड जि.प. समोर आत्महत्या 

Bybaba maske

Dec 6, 2022

धक्कादायक! केज तालुक्यातील मुख्याध्यापकाची बीड जि.प. समोर आत्महत्या 

रोखठोक वार्ताहर 

तालुक्यातील रहिवासी व जि.प.शाळेवर मुख्याध्यापकांनी बीड येथे जिल्हा परिषद कार्यालयासमोर हॉटेलच्या आडूला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी ( दि. ५ ) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. पोलीसांना माहिती दिल्यानंतर शहर पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन रात्रीच मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविले होते. आज सकाळी इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले.

समजलेली अधिक माहिती अशी की, सोमवारी रात्री ११ वाजत काही व्यक्तींना जिल्हा परिषदेच्या नवीन इमारती समोरील एका हॉटेलमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत एका व्यक्तीचा मृतदेह दिसला अन् एकच खळबळ उडाली. याची माहिती शहर पोलीस ठाण्यात देण्यात आली. माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. परंतु हा व्यक्ती कोण? असा प्रश्न पोलीस समोर होता. आज सकाळी ओळख पटली असून, भारत सर्जेराव पाळवदे ( वय ४५ वर्ष ) रा. सासुरा ( ता. केज ) असे मयताचे नाव असल्याचे समजले. ते केज तालुक्यातील जिवाचीवाडी येथील शाळेत मुख्याध्यापक असल्याची माहिती मिळाली. भारत पाळवदे यांनी विषारी द्रव्ये प्राशन करून यानंतर माणसांची रस्त्यावरील वर्दळ कमी झाल्यानंतर जिल्हा परिषद इमारतीच्या समोर एका हॉटेलच्या आडूला दोरीने गळफास घेतला. भारत यांनी आर्थिक विवंचना व मानसिक त्रासाला कंटाळून मृत्यूला कवटाळल्याचे सांगितले जात आहे. परंतु अद्याप कुटुंबाचा जबाब घेतला नसल्याने अधिक माहिती समोर आली नाही. या घटनेने जिल्हा परिषद व केज तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!