• Sat. Apr 25th, 2026

मी हाणल्या सारख करतो तुम्ही  रडल्या सारख कर!! शेवटी कुल्फी देऊन केल शांत..

Bybaba maske

Dec 5, 2022

मी हाणल्या सारख करतो तुम्ही  रडल्या सारख कर!! शेवटी कुल्फी देऊन केल शांत..

98 लाखाचा निधी येऊन सुद्धा नऊ महिन्यापासून काहीच कारवाई का नाही.कारण गुलदस्त्यात.

रोखठोक वार्ताहर 

केज येथील उमरीरोड चे काम चालु करावे व त्याला एक उप मागनी जोडून(भन्साळी ते गिरी सर यांच्या घरा पंर्यत रोडची मागणी)या साठी केज विकास संघर्ष समीती च्या वतीने केज नगरपंचायत समोर घंटानाद आंदोलन करण्यात आले.गेल्या नऊ महिन्या पासुन निधी येऊन ही प्रलंबित ठेवलेल्या प्रश्नावर गेल्या दोन तीन महिन्यांपासून केज विकास संघर्ष समिती आंदोलन करण्याचा इशारा देत होती पण नगरपंचायत एक एक महिन्याचा अवधी मागुन आंदोलन रेटत होती पण आज दि 5/12/2022 रोजी शेवटी केज विकास संघर्ष संमतीने घंटानाद आंदोलन केल पण पुन्हा एकदा एक महिन्याचा अवधी मागुन घेत आंदोलन माघे घेत असल्याचा केज विकास संघर्ष समीतीचे हनुमंत भोसले सरांनी सांगीतले.गेल्या नऊ महिन्या पासुन आलेला 98 लाखाचा निधी आजुन किती दिवस पडून रहाणार हा प्रश्न अजून तर जनतेच्या मनात अनुत्तरीत राहीला आहे.शेवटी मी हाणल्या सारख करतो तुम्ही रडल्या सारख करा…अस काही चाललय का हा प्रश्न नागरिकाकडून चर्चेत येत आहे.कारण काम न चालु करण्याच ठोस कारण समोर येत नाही.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!