तिन तिन ठिकाण चे प्रभारी, एकाही ठिकाणी नाही प्रभावी!!
रात्रीस खेळ चाले!!
रोखठोक न्युज वार्ताहर
केज नगरपंचायतच्या मुख्याधिकारी सुहास हजारे यांच्या कडे सध्या तिन पदभार असल्या मुळे केज नगरपंचायत कडे दुर्लक्ष होत आहे त्या मुळे भुमाफियांचे भागत आहे.केज- अंबाजोगाई रोड लगत लागुन असलेली कोट्यावधी रूपायाची जमीन हडप करण्या साठी टपून बसले आहेत.सर्वे नंबर 30/1 मध्ये गायरान जमीनीची आदलाबदल करून,भूखंड विक्री केली आणि आता कोर्टात प्रकरण असुन त्या वर जिल्हाधिकारी यांना गायरान अदलाबदल व भूखंड विक्री कशी झाली व त्यात आधिकार्यांची काय भुमीका होती ही चौकशी करून 15/2/2023 पंर्यत अहवाल न्यायालयात सादर करण्यास सांगीतले असताना.सद्या नगरपंचायत च्या हद्दीत असलेली विवादित जमीन आहे. या ठिकाणी भुमाफिया बांधकाम करत आहेत.पुर्ण काम हे रात्रीत केले जात आहे.व आता बांधकाम पूर्णत्वास कडे जात असताना नगरपंचायत जाणुन बुजुन त्या कडे दुर्लक्ष करत आहे.नगरपंचायत चे मुख्याधिकारी म्हणून केज चे नायबतहसीलदार व सध्या बीड तहसील चे तहसीलदार सुहास हजारे यांच्या कडे आहे.पण त्यांच्या कडे तीन तीन पदभार असल्या मुळे केज नगरपंचायत कडे लक्ष देण्या साठी वेळ नाही.त्यामुळे भुमाफियांचे फावत आहे.यांनी लवकरच लक्ष नाही दिले तर लवकरच पुर्ण गायरान जमीनीवर अतिक्रमण होईल अशी भीती केज च्या जनतेत व्यक्त होत आहे.सद्या गायरान जमीन 30/1 येथे होत असलेले बांधकामास प्रतिबंध करावा या साठी 3/12/2022 रोजी जिल्हाधिकारी यांना वंचित बहुजन आघाडी तर्फे निवेदन देऊन ही काहीच कारवाई केली केली नाही त्या मुळे वंचित बहुजन आघाडी कडुन संशय व्यक्त केला जात आहे.याच साठी केज नगरपंचायत चे मुख्याधिकारी यांच्या कडून पदभार काढून घेऊन सक्षम अधिकारी नियुक्त करावा अशी मागणी जनतेतून होत आहे.