अधिकाऱ्यांनी मतदान मशिन्सची तपासणी पूर्ण केली : सर्व काही ओके
गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यातील ६६ ग्रामपंचतीच्या होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासन यंत्रणा कामाला लागली असून आज निवडणूक विभागात मतदान करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक मशिन्सची प्रथम स्तरीय तपासणी करण्यात आली.
केज तालुक्यायील ६६ ग्रामपंचायतिच्या सरपंच बसू सदस्यासाठी दि. १८ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या पैकी धर्माळा आणि अनेगाव या दोन ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. तसेच अंशतः काही जागेसाठी बिनविरोध झालेली गावे ही ११ आहेत. त्यात केकतसारणी, पिसेगाव, कुंबेफळ, राजेगाव, सारुळ, जोला, माळेवाडी, सादोळा, औरंगपूर, शेलगाव-गांजी आणि हादगाव (डोका) ही गावे आहेत. एकूण चार सरपंचाच्या निवडी बिनविरोध झाल्या तर ३७ सदस्यांच्या निवडी बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित ६४ ग्राम पंचायतीच्या ६२ सरपंच आणि सदस्यांच्या निवडणुकीसाठी २०८ प्रभागाची निवडणूका होत आहेत. त्यासाठी सरपंच पदासाठी एकूण १७३ उमेदवार रिंगणात आहेत. तर सदस्य पदासाठी ११८४ उमेदवार आपले भवितव्य अजमावित आहेत.
दरम्यान आज दि. ९ डिसेंबर रोजी तहसीलदार दुलाजी मेंडके यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी नायब तहसीलदार लक्ष्मण धस, निवडणूक विभागाचे प्राधिकृत निवडणूक अधिकारी नायब तहसीलदार सचिन देशपांडे, अव्वर कारकून नन्नवरे, पठाण यांनी सर्व निवडणूक निर्णय अधिकारी आणि त्यांचे अधिनिस्त निवडणूक कर्मचाऱ्या यांच्या मार्फत इलेक्ट्रॉनिक मतदान मशिन्स, त्यांचे कंट्रोल युनिट व बॅलेट युनिट्स यांची प्रथम स्तरीय तपासणी करून घेतली.
या निवडणुकीत २१२ कंट्रोल युनिट्स आणि २५० बॅलेट युनिट्स वापरण्यात येणार असून त्यापैकी १०% बॅलेट युनिट्स व कंट्रोल युनिट्स हे राखीव ठेवण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक विभागातून नन्नवरे आणि पठाण यांनी दिली आहे.
————————————————
एकूण ग्राम पंचायती सार्वत्रिक निवडणूक :- ६६पुर्णतः बिनविरोध ग्रामपंचायती :- २