केज येथे सालगड्याच्या पारधी समाजाच्या विवाहित महिलेची आत्महत्या
प्रेम संबंध निर्माण करून तिला त्रास देत असल्याच्या आरोपा वरून एका विरुद्ध ॲट्रॉसिटीसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा
गौतम बचुटे/केज :- केज येथे खबळजनक घटना घडली असून पारधी समाजातील विवाहीत महिलेचे एका सोबत असलेल्या प्रेमसंबंधातून तिला मानसिक त्रास दिल्याने तिने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली या प्रकरणी ॲट्रॉसिटीसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबतची माहिती अशी की, केज येथील पापा इनामदार यांच्या शेतात पारधी समाजातील संजय पवार हा सालगडी म्हणून काम करीत होता. संजय पवार हा त्याची पत्नी अश्विनी सह त्यांच्या शेतात राहत होता त्यातून संजय पवार याची पत्नी अश्विनी पवार हिचे पापा इनामदार याच्या सोबत प्रेमसंबंध निर्माण झाले होते. यात्यांच्या प्रेम प्रकरणामुळे तिचा नवरा संजय पवार व तिच्यात नेहमी लहानसान कारणा वरुन भांडण होत असे. त्यामुळे त्रासाला कंटाळुन अश्विनी पवार हीने गुरुवार दि.८ डिसेंबर रोजी राहत्या घरी उंदीर मारण्याचे औषध प्राशन केले. तिला अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असताना दि.गुरुवार दि. ८ डिसेंबर रोजी सायंकाळी ६:०० उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
या प्रकरणी दि. ९ डिसेंबर रोजी मयत महिलेचा नवरा संजय छबु पवार यांच्या तक्रारी वरून पापा इनामदार याच्या विरुद्ध प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे यांच्या आदेशा वरून प्रभारी ठाणे अंमलदार पोलिस उपनिरीक्षक राजेश पाटील यांनी गुं. र. नं. ५६९/२०२२ भा दं वि ३०६, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा ३ (२) (व्ही) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रभारी पोलीस उपअधीक्षक संतोष वळके हे पुढील तपास करीत आहेत.