अभिनेता ऋत्विक केंद्रे यांची ऋणानुबंध फाउंडेशनचे संचालक आणि ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून निवड….
रोखठोक वार्ताहर
देशातील अनेक अभिनेत्यांना समाजकारणाकडे वळवताना पाहून आनंद होत आहे. त्यातच दरडवाडिचे भुमिपुञ युवा अभिनेता ऋतिक केंद्रे हे ऋणानुबंध फाऊंडेशन समाजासाठी करत असलेले काम पाहता अभिनेता ऋत्विक केंद्रे यांनी फाउंडेशनचा भाग होण्यासाठी स्वारस्य दाखवले व ऋणानुबंध फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्याला हि काहि सामाजिक उपक्रम राबविण्यात आनंद वाटेल असा निरोप दिला व फाऊंडेशनच्या संचालक मंडळाने अभिनेता ऋतिक केंद्रे यांची फाऊंडेशनचे संचालक व ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून निवडीची घोषणा केली .
ऋत्विक हा दिग्गज दिग्दर्शक, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (दिल्ली) चे अध्यक्ष पद्मश्री वामन केंद्रे यांचा मुलगा आहे ज्यांनी अनेक अभिनेत्यांना तयार केले व जे आता हिंदी/मराठी इंडस्ट्रीचे चमकते अभिनेते आहेत आणि हिंदी/मराठी चित्रपट, सिरियल, अभिनेत्री गौरी केंद्रे यांचा मुलगा आहे.
ऋणानुबंध फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विश्वास दराडे यांनी ऋत्विक यांचे फाऊंडेशन मधे स्वागत करत त्यांना पुढिल कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.