• Sat. Apr 25th, 2026

सरपंच पदाच्या उमेदवाराच्या बटन असलेल्या इव्हीएम मशीनमध्ये टाकले स्टिकफास्ट !

Bybaba maske

Dec 18, 2022

सरपंच पदाच्या उमेदवाराच्या बटन असलेल्या इव्हीएम मशीनमध्ये टाकले स्टिकफास्ट !

रोखठोक न्युज वार्ताहर 

ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदाच्या उमेदवारांच्या नावासमोर असलेले बटन स्टिकफास्ट टाकून बंद केल्याचा धक्कादायक प्रकार बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे उघडकीस आला आहे.याबाबत तक्रार झाल्यानंतर सदरील मशीन बदलण्यात आली.

बीड जिल्ह्यात 700 पेक्षा अधिक ग्रामपंचायत साठी रविवारी मतदान प्रक्रिया सुरू झाली.महसूल आणि पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला असल्याने जिल्ह्यात फार कोठे गैरप्रकार झाल्याचे चित्र दिसून आले नाही.

दरम्यान बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे 2 नंबरच्या बुथवर ईव्हीएम मशीन मध्ये गणेश वाणी यांच्या नावासमोर असलेल्या बटनावर स्टिकफास्ट टाकण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत उमेदवार वाणी यांनी तक्रार केल्यानंतर मतदान केंद्राध्यक्ष यांनी खात्री केली आणि सदरील ईव्हीएम मशीन बदलण्यात आली.

या प्रकारानंतर काही काळ लिंबागणेश येथे गोंधळ उडाला होता.मतदान प्रक्रिया देखील थांबवण्यात आली होती.सदरील प्रकार कोणी केला याचा तपास करून संबंधित लोकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी गणेश वाणी यांनी केली आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!