• Sun. Jun 21st, 2026

केज तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत दिग्गजांना चाखावी लागली पराभवाची चव   

Bybaba maske

Dec 20, 2022

केज तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत दिग्गजांना चाखावी लागली पराभवाची चव 

रोखठोक न्युज वार्ताहर 

राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे, भाजपचे तालुका अध्यक्ष भगवान केदार, विष्णू घुले यांच्यासह धनंजय मुंडे समर्थक बालासाहेब तांदळे आणि माजी उपसभापती सरोजीनी ससाणे यांच्या पॅनलचे पराभव

नव्यांना संधी अनेक ठिकाणी प्रस्थापितांना नाकारले

 केज तालुक्यात ग्रामपंचायतीचे निवडणुकीचे निकाल लागले असून त्यात अनेकांना पराभवाची चव चाखावी लागली आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे यांची कन्या डॉ. हर्षदा सोनवणे तसेच केज पंचायत समितीच्या सभापती परिमळा घुले यांचे पती आणि पंकजाताई मुंडे यांचे कट्टर समर्थक विष्णू घुले यांच्यासह भाजपाचे तालुका अध्यक्ष भगवान केदार, माजी उपसभापती सरोजीनी ससाणे आणि धनंजय मुंडे समर्थक बालासाहेब तांदळे यांच्या पॅनलचा दारुण पराभव झाला आहे.

या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील ६६ ग्रामपंचायतिच्या सरपंच व सदस्यासाठी आज दि. १८ डिसेंबर रोजी मतदान झाले. या पैकी धर्माळा आणि आनेगाव या दोन ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. तसेच ११ ग्रामपंचायती या अंशतः काही जागेसाठी बिनविरोध झाल्या आहेत. त्यात केकत सारणी, पिसेगाव, कुंबेफळ, राजेगाव, सारुळ, जोला, माळेवाडी, सादोळा, औरंगपूर, शेलगाव-गांजी आणि हादगाव (डोका) ही गावे आहेत. एकूण चार सरपंचाच्या निवडी बिनविरोध झाल्या तर ३७ सदस्यांच्या निवडी बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित ६४ ग्रामपंचायतीच्या ६२ सरपंच आणि सदस्यांच्या निवडणुकीसाठी २०८ प्रभागाची निवडणूका झाल्या. त्यासाठी सरपंच पदासाठी एकूण १७३ उमेदवार रिंगणात होते. तर सदस्य पदासाठी ११८४ आज मतमोजणी झाली.

आज झालेल्या मतमोजणीच्या ज्यांचा पराभव झाला त्यात राष्ट्रवादीचे नेते आणि बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बजरंग सोनवणे यांची कन्या डॉ हर्षदा सोनवणे यांचा पराभव काँग्रेसचे राहुल सोनवणे समर्थक प्रविणा संतोष सोनवणे यांनी केला. हा पराभव बजरंग सोनवणे यांच्यासाठी मोठी नामुष्कीची असून डॉ हर्षदा सोनवणे यांचा केज नगरपंचायतीच्या निवडणुकीतही पराभव झाला होता. तसेच पंकजा मुंडे यांचे कट्टर समर्थक आणि केज पंचायत समितीच्या सभापती तथा भाजपचे युवा नेते विष्णू घुले यांच्या मातोश्री हौसाबाई घुले यांचा पराभव बजरंग सोनवणे समर्थक राष्ट्रवादीचे संगिता घुले यांनी केला. तर भाजपचे तालुका अध्यक्ष भगवान केदार आणि मनसेचे सुमंत धस यांच्या पॅनलचे कल्याण केदार यांचा पराभव  लक्ष्मी संजय केदार यांनी केला. तर देवगाव येथे भाजपचे रमाकांत मुंडे आणि त्यांचे भाऊ विक्रम मुंडे यांच्या दोन्ही सुनाच्या झालेल्या अटीतटीच्या लढतीत विक्रम मुंडे यांच्या स्नुषा रुपाली अतुल मुंडे या विजयी झाल्या. तर केज पंचायत समितीच्या माजी उपसभापती सरोजीनी दादासाहेब ससाणे यांचा पराभव जानव्ही गोविंद ससाणे त्या बरोबर धनंजय मुंडे यांचे समर्थक राष्ट्रवादीचे बालासाहेब तांदळे यांचा पराभव भाजपचे दत्ता नागरगोजे यांनी दारुण पराभव केला. ग्रापंचायतीच्या निकालात राष्ट्रवादी काँग्रेस ची सत्ता आलेल्या ग्रामपंचायती

 टाकळी – संगीता अनंत घुले, नागझरी – लक्ष्मी चंद्रसेन चौरे, बोरगाव ( बु. ) – बाळासाहेब गव्हाणे, मांगवडगाव – शिरीषकुमार हनुमंत इंगळे, लव्हूरी – पंडित वसंतराव चाळक, शेलगाव-गांजी – श्रीहरी चंद्रसेन जाधव तर भाजपच्या ताब्यात आलेल्या ग्रामपंचायती साबला – जनाबाई नरहरी काकडे, चंदनसावरगाव – उषा जालिंदर, कुंबेफळ – अविनाश दिनकर पांचाळ, देवगाव – रुपाली अतुल मुंडे, मस्साजोग – संतोष पंडितराव देशमुख, पिसेगाव – हनुमंत शेषेराव नेहरकर, कोरेगाव – दत्ता किसन नागरगोजे, डोका – विमल गोरख भांगे, साळेगाव – कैलास जाधव पाटील, चिंचोलीमाळी – रोहिणी सुनील देशमुख, भाटुंबा – अश्विनी ज्ञानेश्वर चौरे, नाव्होली – इंदुबाई रणजित बिक्कड, धनेगाव – आकांक्षा आदेश गुजर, बावची – मनिषा सुरेश नांदे, सांगवी (सा.) – लक्ष्मी संजय केदार तर काँग्रेस ताब्यात आलेल्य ग्रामपंचायती कासारी – अमोल लक्ष्मण डोईफोडे, सारणी (आ.) – प्रविणा संतोष सोनवणे, लाडेवडगाव – इंदूबाई पंढरीनाथ शेप. तसेच संमिश्र असलेल्या ग्रामपंचायती दहिफळ वडमाऊली – डॉ. अनिता शशिकांत गदळे, कळंमअंबा – शशिकांत इंगळे – अपक्ष, गोटेगाव – मंजुषा शहाजी पवार, तांबवा – दीपाली अरुण चाटे, केकतसारणी – अनिता शिवदास काळे, जिवाचीवाडी – प्रेरणा दीपक काळे, एकुरका – प्रशांत केदार, सादोळा – अंगद इंगळे, पिंपळगाव – सचिन राजेभाऊ गायकवाड, केवड – उषा बाळासाहेब सत्वधर, सोनीजवळा – जानवी गोविंद ससाणे, कानडी माळी – अशोक श्रीमंत राऊत, सोनेसांगवी – मुकुंद कणसे, आनंदगाव (सा.) – अंजना गायकवाड, सातेफळ – कृष्णा थोरात, कौडगाव – नारायण नरसिंग महाकुंडे, सावळेश्वर – मारोती बाबुराव कांबळे, इस्थळ – अविनाश श्रीकिशन भालेकर, कानडीबदन – डिगांबर नारायण पांचाळ, दीपेवडगाव – दीपक नरहरी गुळभिले, जवळबन – संध्या प्रमोद करपे, माळेवाडी – सुदाम तात्याराम हाके, पळसखेडा – वसंत बळीराम चव्हाण, उमरी – सुमन विश्वंभर मुळे, लाडेगाव – अंकुश यशवंत अंबाड, सारणी (सां.) – राहुल ओव्हाळ, ढाकेफळ – रतन अंधारे, हदगाव – उमेश यादव, सौंदाणा – दीपाली दीपक भिसे

या निकालात सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध निकाल लागला असून अनेक ग्रामपंचायतीत परिवर्तन झाले आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!