गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यात विविध ठिकाणी शेतकरी बांधवांनी वेळ अमावस्या मोठ्या उत्साहात साजरी केली.
या बाबतची माहिती अशी की यावर्षी समाधानकारक पाऊस झाला असल्याने रब्बीची पिके समाधानकारक आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहामध्ये शेतात वेळ अमावस्या साजरी केली. या निमित्त शेतकऱ्यांनी शेतातील देव-देवतांची पूजा करून शेतात इष्टमित्रासह जेवणाचा आनंद लुटला. जेवणात भाजी-भाकरी, वरण-भात, आंबील, खीर व गोड धोड पदार्थ या पारंपारिक पदार्थाचा वापर करण्यात आला. दरम्यान या वर्षी झालेल्या चांगल्या पर्जन्यमानामुळे रब्बीची पिके जोमात आहेत. गहू, हरभरा, त्याच बरोबर यावर्षी पावटा आणि घेवडा या नगदी पिकांचीमोठ्या प्रमाणात लागवड झालेले असून रब्बी पिका सोबतच बारमाही पाण्याची पिके देखील जोमात आहेत.