• Fri. Jun 5th, 2026

*इन्स्टाग्राम वरून अश्लील फोटो पाठवुन छेड काढणारा सायबर पोलिसांच्या जाळ्यात*

Bybaba maske

Dec 23, 2022

इन्स्टाग्राम वरून अश्लील फोटो पाठवुन छेड काढणारा सायबर पोलिसांच्या जाळ्यात

रोखठोक न्युज 

गौतम बुचटे/केज :- तालुक्यातील एका महाविद्यालयीन युवतीला तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अश्लील फोटो पाठवुन मर्फिंग केलेले व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिची छेड काढणाऱ्या इसमाला बीड पोलिसांच्या सायबर पोलिसांनी अटक केली आहे.

या बाबतची माहिती अशी की, ५ जुन २०२२ रोजी केज येथे विज्ञान शाखेच्या प्रथम वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अश्लील फोटो पाठविले आणि तिचा चेहरा वापरून मॉर्फिंग केलेले व्हीडिओ व्हायरल करून ते व्हीडिओ नातेवाईकांना पाठविण्याची धमकी देऊन तिचा विनयभंग केला.

या प्रकरणी सदर महाविद्यालयीन तरुणीने दि. ७ जून २०२२ रोजी केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. २२६/२०२२ भा. दं. वि. ३५४ (अ), ३५४(ड), ६४ माहिती तंत्रज्ञांन अधिनियम २००० चे कलम ६४ (ड) नुसार गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान बीड पोलिसांच्या सायबर शाखेने तपास करून सदर इन्स्टाग्राम वरून विनयभंग करणाऱ्या एका तरुणाला बीडच्या सायबर शाखेने ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी केज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे हे पुढील तपास करीत आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!