• Sun. Apr 26th, 2026

अज्ञात वाहनाने चिरडले एकजण जागीच ठार

Bybaba maske

Dec 23, 2022

अज्ञात वाहनाने चिरडले एकजण जागीच ठार

रोखठोक न्युज वार्ताहर 

अज्ञात वाहनाने चिरडून गेल्याने तरुण जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी ( दि. २३ ) सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास नेकनूर-मांजरसुंबा रस्त्यावर रत्नागिरी पाटीजवळ घडली आहे.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, शरद भारत मेंगडे ( वय २५ वर्ष ) रा. सफेपूर ( ता. बीड ) असे मयत तरुणाचे नाव असल्याचे सांगितले जात आहे. शरद यास चार चाकी अज्ञात वाहनाने चिरडून पसार झाला. चाक डोक्यावरून गेल्याने चेंदामेंदा झाला आहे. रक्तात भरलेले चाकाच्या नकशीवरुन धडक देणारे वाहन चारचाकी असावं असा पोलीसांचा अंदाज आहे. माहिती मिळताच नेकनूर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी नेकनूर कुटीर रुग्णालयात हलविले आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!