बस झाल्या घोषणांच्या रिकाम्या तुताऱ्या आम्हांला हव्यात कार्यान्वित मुताऱ्या..!
जनता सामुदायिक मूत्रविसर्जन” मोहीम उघडणार का?
रोखठोक न्युज वार्ताहर
प्रत्येक गावांत एक कळीचा प्रश्न प्रामुख्याने असतो तो म्हणजे लघुशंका / शौचालय सार्वजनिक ठिकाणी कुठे आहेत ते भिंग लावून शोधावे लागतात.
नैसर्गिक गरज म्हणून केज शहरांत देखील, जर बस स्टँडवरची मुतारी सोडली तर कोठेच नाही.मंगळवार पेठ, कानडीरोड या ठिकाणी मोठी बाजारपेठ आहे.तेथे सुद्धा शौचालय किंवा मुतारी नाही.
भवानी चौक ते छत्रपती शिवाजीमहाराज चौक ते शिक्षक काॅलनी पंर्यत तसेच मौलाना अबुल कलाम आझाद चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक (मुख्य रस्ता)
इतर अंतर्गत रस्ते सोडा बाकी वरीलपैकी कोणत्या रस्त्यावर सार्वजनिक मुताऱ्या व शौचालय आहेत ते माहिती असल्यास कळवा.
मागे काही तात्पुरता स्वरूपाच्या मुताऱ्यांचा प्रयोग झाला होता पण तो फक्त दिखावा ठरला.
विचार करा, इथल्या बाजारपेठेत मूलभूत सुविधाचं नसतील तर व्यापारी आणि खरेदीदार कसे टिकतील व नवे कसे आकर्षित होतील.
गाडगे बाबा म्हणत ‘कोणत्याही शहराची प्रगती शहराच्या उकिरड्यावरून तुम्हांला कळेल’.
नगरपंचायतला जाणीव करून देण्या साठी नागरिकांना “सामुदायिक मूत्रविसर्जन” मोहीम उघडली तर अवघड होईल.
केज येथील नागरिकांच्या आरोग्य आणि सुविधेसाठी अत्यावश्यक आहे. स्त्रियांची तर किती कुचंबणा होत असेल याचा विचार न केलेला बरा.
नागरिकांना कोणत्या पक्षाच्या सत्तेच्या काळात किती निधी आला व कुठे गेला याच्याशी काडीचेही ‘देणे घेणे’ नाही.
केज नगरपंचायतला नगराध्यक्ष म्हणून एक महिला भेटलीआहे.कमीत कमी त्यांनी तरी ‘सार्वजनिक शौचालय व मुतारी’ हा मुद्दा प्राधान्याने मांडायला पाहिजे होता पण प्रत्यक्षात सत्ताधारी उमेदवाराने ‘ना काही केले’, ‘ना विरोधी पक्षांनी’ सत्ताधाऱ्यांना या मुद्द्यावर सातत्याने ‘धारे’वर धरले पाहीजे.त्यांच मुळे आता केज शहरातील नागरिकांना आता “सामुदायिक मूत्रविसर्जन” अंदोलन करावे लागते का काय? असे जनतेत चर्चा आहे.