अबब शंभर विहीरीचा घोटाळा.तीन ते चार कोटीचा घोटाळा.
केज तालुक्यातील डोका गावात भ्रष्टाचार
रोखठोक न्युज वार्ताहर
केज : तालुक्यातील डोका येथील ‘एमआरइजीएस’च्या ११० विहिरींचे • काम पूर्ण न करताच निधी उचलणे, पहिली विहीर मंजूर असतानाही दुसरी मंजूर करून तिचे पूर्ण काम न करताच निधी उचलणे अशा प्रकारे कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करुन माजी सरपंच रमेश भांगे, बापूराव भांगे व ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांसह, इतर अधिकाऱ्यांकडे करून चौकशीची मागणी केली होती. रोहयोचे प्रभारी उपजिल्हाधिकारी एम. के. सुकटे यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
२०१६ ते २०२२ या कालावधीत डोका येथे ‘एमआरइजीएस’च्या ११० विहिरींना सरपंच व ग्रामसेवकांनी स मंजुरी मिळवली होती. परंतु त्यापैकी ५ ते १० विहिरी सोडल्या तर बाकीच्या एकाही विहिरीचे काम न करताच,सरपंच, ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक,कनिष्ठ अभियंता, पंचायत समितीचे लेखापाल आणि गटविकास अधिकार्यानी संगनमत करून निधी उचलून अपहार केल्याचा आरोपही निवेदनात निवेदनात करण्यात आला आहे. आरोपांसंदर्भात याप्रकरणी ग्रामसेवक धनंजय यादव यादव यांची प्रतिक्रिया समजू शकली यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क होऊ शकला नाही.
अबब! सहा विहिरी खोदल्याच नाहीत?
सहा विहिरींचे काम न करताच संगनमत करून निधी हडप करण्यात आला आहे. माझ्या नावावर विहीर मंजूर करून माझ्या शेतात न घेताच त्या विहिरींची रक्कम उचलल्याची तक्रार शेतकरी लक्ष्मण भीमराव भांगे यांनी केली आहे.
अंदाजपत्रकापेक्षा जास्त निधी उचलला
डोका येथील २१ विहिरींचा निधी अंदाजपत्रकापेक्षा जास्तीचा उचलण्यात आल्याचा आरोप माजी सरपंच रमेश भांगे यांनी ‘रोखठोक बोलताना केला आहे.
गाय गोठ्यांचे काम न करताच निधी उचलला
डोका गावात १५ शेतकऱ्यांच्या गाय गोठ्यांचे काम पूर्ण झाल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आले असले तरी प्रत्यक्षात एकाही गाय गोठ्यांचे काम झाले नाही, असा आरोप माजी सरपंच बापूराव भांगे यांनी केला आहे.
४ विहिरी खोदूनही गाव तहानेने व्याकूळ
डोका गावची लोकसंख्या दीड हजाराच्या आसपास असताना येथे पाणीपुरवठाच्या नावाखाली पहिल्या दोन विहिरी असतानाही नवीन दोन विहिरी खोदल्या. असे असल्या तरी सात महिन्यांपासून गावच्या नळाला पाणी येत नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.