• Sun. Apr 26th, 2026

*शेतातून जाऊ नको म्हणून डोक्यात काठी मारून पोटाला चावा घेतला*

Bybaba maske

Jan 2, 2023

शेतातून जाऊ नको म्हणून डोक्यात काठी मारून पोटाला चावा घेतला

रोखठोक न्युज 

गौतम बचुटे/केज :- पिकाला पाणी देण्यासाठी शेतात गेलेल्या एकाला आमच्या शेतातून तू जाऊ नको म्हणून तिघांनी संगनमत करून काठीने मारहाण करून पोटाला चावा घेतल्याची घटना घडली आहे.

या बाबतची माहिती अशी की, सतीष मोहन जोगदंड हे दि ३१ डिसेंबर रोजी त्यांच्या गट नं. /सर्वे नं. १८९ मधील पिकाला पाणी देण्यासाठी गेले असताना प्रताप अभिमान जोगदंड, बाळासाहेब दगडु बसवर आणि प्रशांत अभिमान जोगदंड यांनी दारू पिऊन सतीष मोहन जोगदंड याला तु आमच्या शेतातून जाऊ नको असे म्हणून तिघांनी संगनमत करून त्याच्याशी भांडण केले. तसेच काठीने मारहाण केली आणि बाळासाहेब बसवर हा सतीश जोगदंड याच्या पोटाला चावला.

या प्रकरणी दि. १ जानेवारी रोजी सतीश जोगदंड याच्या तक्रारी वरून केज पोलीस ठाण्यात प्रताप अभिमान जोगदंड, बाळासाहेब दगडु बसवर आणि प्रशांत अभिमान जोगदंड या तिघांच्या विरुद्ध गु र नं ०१/२०२३ भा. दं. वि. ३२४,३२३, ५०४, ५०६ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बाळराजे सोनवणे हे पुढील तपास करीत आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!