आपघातात एक जन ठार:मोटारसायकल विद्युत पोलला जाऊन धडकली.
रोखठोक न्युज वार्ताहर
केज तालुक्यातील होळ येथील सूतगिरणी जवळ शंकर फकिरा धोत्रे वय 40 वर्ष राहणार मागाव जिल्हा यवतमाळात येथील रहिवाशी केज येथील नांदुरघाट येथे रस्त्याच्या कामावर खडी फोडण्याचे काम करतात.ते नांदुरघाट येथून आपल्या गावी मोटारसायकल वरून जात असताना रात्री होळ नजीक रस्त्याच्या कडेला असलेल्या विद्युत पोलवर जाऊन मोटारसायकल धडकली व त्यात ते गंभीर जख्मी झाले.प्रायव्हेट ॲब्युलन्स नये चालक संतोष वळसे यांनी त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता मृत घोषित केले.