• Sun. Apr 19th, 2026

शिकवणी वरून घराकडे जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून विनयभंग  

Bybaba maske

Jan 8, 2023

शिकवणी वरून घराकडे जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून विनयभंग 

रोखठोक न्युज 

 एकावर विनयभंगासह बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल

गौतम बचुटे / केज :-शिकवणीचा  वर्ग सुटल्या नंतर स्कुटी वरून घरी जात असलेल्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिची छेड काढून विनयभंग केल्याची घटना केज तालुक्यात घडली असून पीडितेच्या तक्रारी वरून एका विरुद्ध विनयभंग आणि बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

केज तालुक्यातील एका गावातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही तिच्या गावातून स्कुटीवर क्लासला येते. दि. ७ जानेवारी रोजी रात्री ७.१५ वा. सुमारास सदरची ती अल्पवयीन मुलगी ही ट्युशन क्लास सुटल्यावर स्कुटी वरून गावाकडे जात असताना शहाबाज सय्यद रा. केज याने तिचा पाठलाग करुन तिला शहरातील एका शाळे जवळ गाठले आणि तिची छेड काढली. घडलेल्या प्रकाराने घाबरलेल्या पीडित मुलीने ही माहिती घरी तिच्या पालकांना सांगितली. त्या नंतर रात्री ११.०६ वाजेच्या सुमारास पीडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी शहाबाज सय्यद याच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात विनयभंग आणि बाल लैंगिक अत्याचार कायद्यान्वये गु. र. नं. ७/२०२४ भा. दं. वि. ३५४ (ड) आणि बाल लैंगिक अत्याचार कायदा २०१२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केज पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे हे करीत आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!