• Sun. Apr 19th, 2026

बस स्टँडवर गाडी घेऊन जायच आणि फुकटात भांडण घ्याच.

Bybaba maske

Jan 9, 2023

बस स्टँडवर गाडी घेऊन जायच आणि फुकटात भांडण घ्याच.

पोलीसांनी आताच हस्तक्षेेप केला नाही तर काही तरी अक्रित घडेल.

रोखठोक न्युज 

केज शहरातील मधोमध असलेले बस स्टॅंड सद्या फुकटात भांडण अंगावर घेण्या साठी प्रसिद्ध होत आहे.टपऱ्यांचे शहर म्हणून ओळख असलेले केज शहर आहे.बीड लातूर रोड वरती वसलेले हे शहर टपऱ्यांचे शहर म्हणून ओळखले जाते कारण रस्त्याच्या एका बाजुला आतिक्रमन केलेल्या लोकानी पत्र्याच्या टपऱ्यां टाकून व्यवसाय स्थापित केला आहे.त्याच्या मधोमध केज चे बस स्टॅंड आहे.पण आता नवीन लचांड केज च्या नागरिकाच्या गळ्यात पडले आहे.केज चे बस स्टॅंड मधील मोकळी जागा ही व्यवसायिक पार्किंग साठी भाडेतत्त्वावर दिली आहे.नेमकी जागा किती तर दहा बारा फुट.त्यात एखादा नातेवाईकास किंवा घरातल्या मंडळीस सोडवायला गेले की लगेच पार्किंग वाले चिठ्ठी हातात सोपवणार व पैश्यांची मागणी करणार.त्याला किती ही सांगीतल की आम्ही फक्त बस स्टँडवर नातेवाईक सोडायला आलो तरी ते पैसेच वसूल करणार…. नाही काही म्हटलेच तर हमरीतुमरीवर येणार घरातल्या बाई माणसा समोर शिव्या देणार.सतत नशेत असलेले हे मुले सरळ अंगावर धावून येतात असे प्रवासी म्हणत आहेत.जुने बस स्टॅंड असताना ज्या व्यक्ती कडे येथील कॅन्टीन होती.त्यानेच जुगाड लावून ही शक्कल लढवली असे बोलले जात आहे.त्याच मुळे येथे वसूली साठी गुंड माणसे ठेऊन वसुली केली जाते.बस स्टॅंड वर पार्किंग साठी प्रशस्त जागा नसताना , एस टी महामंडळातील अधिकाऱ्याने स्वताचा खिसा गरम करण्याच्या नादात केज वाशीयाचे अब्रू चे लक्तरे काढण्या साठी ती दहा,वीस फुटाची जागा पार्किंग साठी दिल्याचे बोलले जात आहे.हे वेळीच आवरले नाही तर एखादे मोठे भांडण येथे होईल असे चर्चीले जात आहे.त्यामुळेच आता बस स्टॅंड वर एक पोलीस चौकी उभारण्यात यावी असी मागणी जनतेतून होत आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!