• Fri. Jun 5th, 2026

पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांची गुटख्या विरुद्ध केज शहरात झाडाझडतती !पान टपरी आणि गुटखा विक्री करणाऱ्या बारा जणांनाच्या विरुद्ध गुन्हे दाखल

Bybaba maske

Jan 13, 2023

पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांची गुटख्या विरुद्ध केज शहरात झाडाझडतती !

पान टपरी आणि गुटखा विक्री करणाऱ्या बारा जणांनाच्या विरुद्ध गुन्हे दाखल

रोखठोक न्युज वार्ताहर 

गौतम बचुटे/केज :- केज शहरातील पान टपऱ्या आणि गुटका विक्री केंद्रावर सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमार यांच्या पथकाने कारवाया करून गुटखा आणि तंबाखूयुक्त पान मसाला मोठ्या प्रमाणात ताब्यात घेतला आहे.
या बाबतची माहिती अशी की, केज शहरात टपऱ्यावर गुटखा विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना मिळाली. माहिती मिळताच दि. १३ जानेवारी रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या आदेशाने पोलीस नाईक बाळासाहेब अहंकारे, राजु गुंजाळ, बाबासाहेब बांगर, राजु वंजारे, सचिन अहंकारे, विकास चोपणे, संजय फुले यांच्या पथकाने केज शहरातील अजीजपुरा, कानडी चौक, क्रांती नगर, मंगळवार पेठ, समर्थ नगर, कुरेशी मोहल्ला टपऱ्या आणि किराणा दुकानावर धाडी घातल्या. त्या धाडीत गोवा, गुटखा, आर एम डी यासारखे महाराष्ट्रात विक्रीला बंदी असणारे १२ हजार रु किंमतीचे तंबाखूजन्य पदार्थाचा मुद्देमाल जप्त केला.
दरम्यान केज पोलीस ठाण्यात पोलीस नाईक श्रीकांत चौधरी आणि पोलीस नाईक बाळासाहेब अहंकारे यांच्या तक्रारी केज पोलीस ठाण्यात मोहसीन मुस्तफा तांबोळी, शेख मुजीब इस्माईल, पठाण मोजम मुकरम, मुजाहिर इस्माईल, सुभाष लक्ष्मण राऊत, पप्पू कदम, सबदर बुडन सय्यद, जहीर मुनीर फारोकी, सुनील महादेव काळे, सलिम मेनोद्दीन, सुरेश लक्ष्मण राऊत, तोफिक जावेद शेख या बारा जणा विरुद्ध भा.द.वी.३२८२७२ आणि २७३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक राठोड आणि पोलीस नाईक रूकमानंद घोलप हे तपास करीत आहेत.
ग्रामीण भागातील टपऱ्या चालकही धास्तावले :-एकाच वेळी बारा गुटखा विक्रेत्यांवर केलेल्या कारवायामुळे आता ग्रामीण भागातील टपऱ्या, गुटखा विक्रेते आणि अवैद्य धंदेवाल्यात दहशत निर्माण झाली आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे व पोलिसांची चांगलीच दहशत निर्माण झाली आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!