• Fri. Jun 5th, 2026

ट्रॅक्टर अंगावरून गेल्याने तरुणाचा मृत्यू.

Bybaba maske

Jan 14, 2023

ट्रॅक्टर अंगावरून गेल्याने तरुणाचा मृत्यू.

रोखठोक न्युज वार्ताहर 

हार्वेस्टर मशीनवर ऑपरेटरचे काम करणारा तरुण साखर कारखान्याच्या आवारात झोपला असताना अंगावरून ट्रॅक्टर गेल्याने त्याचा मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी (दि.१२) रात्री झाला. संदीप बबन घाडगे (वय २१, रा. पठाण मांडवा, ता. अंबाजोगाई) असे त्या मयत तरुणाचे नाव आहे.
पठाण मांडवा येथील होतकरू तरुण संदिप घाडगे हा हार्वेस्टर मशीनवर ऑपरेटरचे काम करत असे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री तो लातूर जिल्ह्यातील एका कारखान्यावर मुक्कामी होता. रात्रीच्या वेळी जेवण करून संदिप कारखान्याच्या आवारात झोपी गेला. रात्रीतून एक ट्रॅक्टरचालकाने निष्काळजीपणामुळे ट्रॅक्टर झोपलेल्या संदिपच्या अंगावरून घातले. या अपघातात संदिप गंभीर जखमी झाला. सोबतच्या सहकाऱ्यांनी त्याला तातडीने लातूरच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, तिथे उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी संदिपच्या पार्थिवावर मांडवा पठाण येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मातापित्यांचा एकुलता एक मुलगा असणारा संदिप घरातील करता पुरुष होता. त्याच्या मृत्यूने आई-वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!