• Sun. Apr 19th, 2026

येथील माजी आमदार बाजीराव जगताप यांचा नातू अपघातात मृत्यू.

Bybaba maske

Jan 14, 2023

येथील माजी आमदार बाजीराव जगताप यांचा नातू अपघातात मृत्यू.

रोखठोक न्युज वार्ताहर 

येथील माजी आमदार बाजीराव जगताप यांचा नातू आणि भाजपा नेते छत्रपती कारखान्याचे व्हाईस चेअरमन मोहन जगताप यांचे पुतणे विश्वजीत जीवन जगताप हे औरंगाबादहून माजलगावला काम आटोपून परत येत असताना शुक्रवारी रात्री १२ वाजण्याच्या दरम्यान गेवराई जवळ अपघात होऊन जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. तर, विश्वजीत यांच्या सोबत असलेला मित्र सीटबेल्ट लावलेला असल्याने बालंबाल बचावला.
माजलगाव येथील छत्रपती नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन जीवनराव जगताप यांचे चिरंजीव विश्वजीत जगताप व त्याचा मित्र आर्यन कंटुळे हे काही कामा निमित्त औरंगाबादला गेले होते. काम आटोपून गावी माजलगावकडे येत असताना गेवराई जवळ शुक्रवारी रात्री बाराच्या दरम्यान त्यांच्या चार चाकी वाहनावरील (क्रेटा MH 44, T5152) विश्वजित याचा ताबा सुटल्याने आयसर (टेम्पो) ला धडक बसली. यात विश्वजित यांच्या डोक्याला जबर मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्यासह असलेला मित्र आर्यन कंटुळे हा सीट बेल्ट लावलेला असल्याने सुदैवाने वाचला. ही घटना शुक्रवारी रात्री बाराच्या दरम्यान घडली. विश्वजीत जगताप यांच्या पश्चात आई- वडील, दोन बहिणी असा परिवार आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!